Volkswagan India ने भारतामध्ये गुरुवारी Taigun कार च्या 1 वर्ष अनिव्हर्सरी मुळे एक नवीन इडिशन लाँच केले आहे. सध्या हे इडिशन Curcuma Yellow आणि Wild Cherry Red व्यतिरिक्त नवीन राइजिंग ब्लू कलरमध्ये उपलब्ध आहे. अगदी भारतामध्ये १५२ डीलरशीप उपलब्ध होणार आहे.
४०००० हजार युनिट्स विकल्याचा केला दावा :-
Volkswagan या कंपनी ने दावा केला आहे की मागील एका वर्षात Taigun या कार ची चाळीस हजार पेक्षा जास्त युनिट विकले आहेत. Taigun या कारचा पुरवठा कमी असून सुद्धा Volkswagan ने मागील वर्षात भारतात जवळपास २२ हजार पेलह अधिक युनिट्स डिलिव्हरी केल्याचा दावा केलेला आहे.हि कार प्रेमींना एक चांगली बातमी आहे कारण या कंपनीने भारतात नाही तर संपूर्ण जगात मोठे नाव कमावले आहे.
हेही वाचा:भारतात BMW ची कुपे SUV ची इडिशन लाँच, जाऊन घ्या फीचर्स आणि किंमत
इंजिन आणि मायलेज :-
स्पेशल एडिशन मॉडेल डायनॅमिक लाइन आणि टॉपलाइन ट्रिम्सवर आधारित आहे. या कारला मॅन्युअल गिअरबॉक्स सोबतच 1 लिटर TSI पेट्रोल इंजिन मिळते. तसेच ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा सुद्धा पर्याय आहे. पेट्रोल इंजिन 115 PS पॉवर आणि 178 Nm पीक टॉर्क जनरेट करते. Taigun ला 1.5 लीटर TSI EVO इंजिन देखील मिळते, जे 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 7-स्पीड DSG ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. हे इंजिन जास्तीत जास्त 150 PS पॉवर आणि 250 Nm टॉर्क जनरेट करते. वाहन निर्मात्या चा दावा आहे की Taigun या कार चे मायलेज हे 17.23 kmpl.
हेही वाचा:टाटा लवकरच करतेय भारतात नवीन इलेक्ट्रिक कार लाँच, जाणून घ्या किंमत
जाणून घ्या फीचर्स :-
Volkswagen Taigun या कार बद्धल सांगायचे म्हणले तर त्यामध्ये ११ खास विकसित घटक आहेत. जसे की हाय लक्स फॉग लॅम्प्स, बॉडी-कलर डोअर गार्निश, ब्लॅक सी-पिलर ग्राफिक्स, ब्लॅक रूफ फॉइल, डोअर-एज प्रोटेक्टर, ब्लॅक ORVM कॅप, विंडो व्हिझर्स अॅल्युमिनियम पेडल सारखे फीचर्स आहेत. Volkswagen Taigun ची किंमत ही ११.४० लाख रुपये पासून सुरू होती ते टॉप मॉडेल ची एक्स शोरूम किंमत ही १८.६० लाख रुपये आहे.
Published on: 13 September 2022, 09:02 IST