Automobile

भारत देशातील दुचाकी आणि तीन-चाकी वाहन वाहन तयार करणाऱ्या TVS मोटर कंपनीने सोमवारी TVS NTORQ 125 Race Edition मरीन ब्लू रंगात लाँच करण्याची घोषणा केली आहे. ब्लॅक, मेटॅलिक ब्लॅक आणि मेटॅलिक ब्लू या तीन कलरच्या युनिक कॉम्बिनेशनमुळे गाडी चॅन दिसणार आहे.

Updated on 13 September, 2022 10:15 PM IST

भारत देशातील दुचाकी आणि तीन-चाकी वाहन वाहन तयार करणाऱ्या TVS मोटर कंपनीने सोमवारी TVS NTORQ 125 Race Edition मरीन ब्लू रंगात लाँच करण्याची घोषणा केली आहे. ब्लॅक, मेटॅलिक ब्लॅक आणि मेटॅलिक ब्लू या तीन कलरच्या युनिक कॉम्बिनेशनमुळे गाडी चॅन दिसणार आहे.

किती असेल किंमत :-

मरीन ब्लू कलरमधील नवीन TVS NTORQ 125 रेस एडिशनची दिल्लीमध्ये एक्स-शोरूम किंमत 87,011 हजार रुपये आहे. जे की सध्या भारतात या गाडीची सर्व शोरूम ची बुकिंग सुद्धा चालू आहे.

कसा आहे लूक आणि डिझाईन :-

TVS Ntorq 125 Race Edition ला सिग्नेचर LED टेल आणि हेडलॅम्प्स आहेत त्यामुळे ते धावून आल्यासारखे दिसते. तसेच एक रेस चा सिम्बॉल भेटतो त्यामुळे अजूनच रेसिंग चा अनुभव येतो.

हेही वाचा:टाटा लवकरच करतेय भारतात नवीन इलेक्ट्रिक कार लाँच, जाणून घ्या किंमत

इंजिन आणि स्पीड :-

Tvs ची स्कुटर ही 124.8 cc, सिंगल-सिलेंडर, 4-स्ट्रोक, 3-व्हॉल्व्ह, एअर-कूल्ड SOHC, फ्युएल इंजेक्टेड इंजिन आहे. हे इंजिन 7000 rpm वर 6.9 kW/9.38 PS ची पॉवर आणि 5,500 rpm वर 10.5 Nm चा पीक टॉर्क तयार करते. कंपनीचा दावा आहे की रेस एडिशनला ताशी 95 किमीचा टॉप स्पीड भेटतो आणि ही स्कूटर फक्त 9 सेकंदात 0 ते 60 किमी प्रतितास वेगाने धावू शकते.

हेही वाचा:भारतात BMW ची कुपे SUV ची इडिशन लाँच, जाऊन घ्या फीचर्स आणि किंमत

काय आहेत फीचर्स :-

TVS SmartXonnectTM सह येते. जे की या स्मार्ट फीचर्समुळे आपण स्मार्टफोनला स्कूटरशी कनेक्ट करू शकतो.।एवढेच1न्हवे तर या स्कूटरमध्ये पास बाय स्विच, ड्युअल साइड स्टिअरिंग लॉक, पार्किंग ब्रेक आणि इंजिन किल स्विच यांसारखे महत्त्वाचे फिचर्स उपलब्ध आहेत. तसेच, TVS NTORQ 125 Race Edition USB चार्जर, मोठे 20-लिटर अंडरसीट स्टोरेज आणि TVS पेटंट केलेले EZ सेंटर स्टँड मिळते.

English Summary: TVS Company launches powerful scooter, know features and price
Published on: 13 September 2022, 10:11 IST