Automobile

सध्या सणासुदीचे दिवस चालू असून कालपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सगळीकडे मंगलमय आणि प्रसन्न वातावरण असून आता थोड्याच दिवसात दसरा आणि दिवाळी या महत्त्वपूर्ण सणांचे आगमन होणार आहे. या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अनेक जण बाईक, कार खरेदी करण्यासाठी इच्छुक असतात. याच पार्श्वभूमीवर आता विविध बाजारपेठेतील प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या ऑफर सुरू असून ग्राहक त्याचा फायदा देखील घेत आहेत. अशीच जबरदस्त डिस्काउंट ऑफर काही बाईकच्या बाबतीत देण्यात येत असून यासंबंधीचे महत्वपूर्ण माहिती आपण या लेखात घेऊ.

Updated on 27 September, 2022 3:07 PM IST
AddThis Website Tools

 सध्या सणासुदीचे दिवस चालू असून कालपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सगळीकडे मंगलमय आणि प्रसन्न वातावरण असून आता थोड्याच दिवसात दसरा आणि दिवाळी या महत्त्वपूर्ण सणांचे आगमन होणार आहे. या सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवर अनेक जण बाईक, कार खरेदी करण्यासाठी इच्छुक असतात.

याच पार्श्वभूमीवर आता विविध बाजारपेठेतील प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या ऑफर सुरू असून ग्राहक त्याचा फायदा देखील घेत आहेत. अशीच जबरदस्त डिस्काउंट ऑफर काही बाईकच्या बाबतीत देण्यात येत असून यासंबंधीचे महत्वपूर्ण माहिती आपण या लेखात घेऊ.

नक्की वाचा:Keeway या कंपनीने भारतामध्ये केली दोन मोटारसायकल लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

 'या' कंपनीच्या बाईकवर मिळत आहे डिस्काउंट ऑफर

 सध्या बाईक निर्मिती क्षेत्रातील टीव्हीएस कंपनीने तीन टॉप क्लास बाईक वर या सणासुदीच्या दिवसांमध्ये चांगल्या ऑफर देऊ केल्या आहेत.

1- टीव्हीएस स्पोर्ट- जर तुम्हाला टीव्हीएस स्पोर्ट बाईक घ्यायचे असेल तर तुम्ही या फेस्टिव सीजन मध्ये तब्बल आठ हजार रुपयांची बचत करू शकता. जर तुम्हालाही बाईक खरेदी करायची असेल तर तुम्ही 5555 रुपयांच्या डाऊन पेमेंटवर खरेदी करू शकतात

तसेच यामध्ये तुम्हाला दोन हजार शंभर रुपयांची निश्चित सूट देखील देण्यात येणार आहे. या बाईकची एक्स शोरूम किंमत 64 हजार पन्नास रुपये इतकी असून यामधील टॉप व्हेरीअन्टची किंमत 67 हजार 543 रुपये इतकी आहे.

नक्की वाचा:Bike update:सणासुदीच्या दिवसात बाईक घ्यायची?तर 'या'आहेत कमी किमतीत मिळणाऱ्या दमदार बाईक्स, वाचा डिटेल्स

2- टीव्हीएस रेडियन- जर तुम्हाला टीव्हीएस रेडियन बाईक घ्यायची असेल तर तुम्ही यावर आठ हजार रुपयांची सूट मिळवू शकतात व दोन हजार शंभर रुपयांची निश्चित सूट समाविष्ट आहे.

ही बाईक तुम्हाला खरेदी करायचे असेल तर तुम्ही पाच हजार पाचशे पंचावन्न रुपयांचा डाऊन पेमेंट वर खरेदी करू शकतात. या बाईकची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 59925 रुपये असून यामधील टॉप व्हेरिएंटची किंमत 77 हजार 794 रुपये किती आहे.

3- टीव्हीएस स्टार सिटी+- यावर देखील तुम्हाला आठ हजार रुपयांची सूट मिळणार असून 2100 रुपयांची निश्चित सूट समाविष्ट आहे. ही बाईक देखील तुम्ही 5555 रुपयांच्या डाऊन पेमेंट वर खरेदी करू शकतात. या बाईकची एक्स शोरूम किंमत( दिल्ली) 70 हजार दोनशे पाच रुपये असून यामधील टॉप व्हेरिएंटची किंमत 72 हजार 955 रुपये आहे.

नक्की वाचा:Honda Activa : जबरदस्त ऑफर ! सणासुदीला होंडा ऍक्टिवा फक्त 8 हजारात घरी घेऊन जा, ऑफर आधी समजून घ्या

English Summary: tvs company give attractive discount on this three tvs bike
Published on: 27 September 2022, 02:32 IST