भारतातील एंट्री लेव्हल स्पोर्ट्स बाइक सेगमेंट लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. या विभागात लोकप्रिय टू व्हिलर निर्माती कंपनी टीव्हीएसने अनेक बाईक लाँच केल्या आहेत. या कंपनीची TVS Apache RTR 160 (TVS Apache RTR 160) ही या सेगमेंटमधील कंपनीची एक भन्नाट बाईक आहे. या बाईकला तिच्या स्टायलिश स्पोर्टी लुकसाठी प्राधान्य दिले जाते. या एंट्री लेव्हल स्पोर्ट्स बाईकमध्ये तुम्हाला उत्तम मायलेजसह मजबूत इंजिन मिळते. कंपनीने या बाइकमध्ये आधुनिक फीचर्सही दिले आहेत.
कंपनीने त्याच्या डबल डिस्क व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत ₹ 1,15,940 ठेवली आहे, आणि ऑन-रोड किंमत ₹ 1,35,855 पर्यंत आहे. विशेष म्हणजे कंपनी तुम्हाला या बाईकवर फायनान्स सुविधा देखील देत आहे.
TVS Apache RTR 160 बाईकसाठी उपलब्ध फायनान्स प्लॅन
TVS Apache RTR 160 ही बाईक जर तुम्हाला फायनान्स वर खरेदी करायची असेल तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, ऑनलाइन डाउन पेमेंट आणि EMI कॅल्क्युलेटरचा विचार केला असता ही बाईक खरेदी करण्यासाठी बँकेकडून ₹ 1,21,855 चे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. म्हणजेच तुम्ही ही लोकप्रिय एंट्री लेव्हल स्पोर्ट्स बाईक किमान ₹ 14,000 चे डाउन पेमेंट देऊन घरी घेऊन जाऊ शकता.
कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्ही दरमहा ₹ 3,915 चा मासिक EMI बँकेत जमा करू शकता. TVS Apache RTR 160 (TVS Apache RTR 160) बँकेकडून बाईक कर्ज 3 वर्षांच्या कालावधीसाठी म्हणजे 36 महिन्यांसाठी उपलब्ध आहे. त्याच वेळी, बँकेकडून मिळालेल्या या कर्जावर बँक वार्षिक 9.7 टक्के दराने व्याज आकारते.
TVS Apache RTR 160 (TVS Apache RTR 160) बाईकचे तपशील:
TVS Apache RTR 160 ही बाईक कंपनीची सर्वाधिक विकली जाणारी एंट्री लेव्हल स्पोर्ट्स बाईक आहे. या बाइकमध्ये कंपनीने 159.7 cc चे सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे.
हे इंजिन एअर कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित आहे आणि हे जास्तीत जास्त 15.53 PS पॉवर आणि 13.9 Nm पीक टॉर्क बनविण्यास सक्षम आहे. या इंजिनसोबत तुम्हाला 5 स्पीड गिअरबॉक्स मिळत आहे. या बाइकमध्ये तुम्हाला कंपनीने जास्त मायलेज दिले आहे. कंपनीच्या मते, या बाईकमध्ये तुम्हाला ARAI द्वारे प्रमाणित 55.47 किलोमीटर प्रति लिटरचे मायलेज मिळते.
Published on: 22 June 2022, 11:09 IST