पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दराचा पार्श्वभूमीवर बरेच लोक सीएनजी कारकडे वळत आहेत. परंतु आता सीएनजीची किंमत देखील वाढली असून सीएनजी देखील आता परवडत नाही. जसे आपण पेट्रोल किंवा डिझेलवर चालणाऱ्या कार च्या मायलेज बाबत विचार करतो, तसेच गोष्ट सीएनजी कारच्या बाबतीत देखील लागू होते. तसे पाहायला गेले तर पेट्रोल किंवा डिझेलच्या तुलनेमध्ये सीएनजीचे मायलेज जास्त आहे.
परंतु काही कारणामुळे सीएनजी कार मध्ये देखील कमी मायलेज ची समस्या उद्भवते. या लेखात आपण काही छोट्या टिप्स पाहू. ज्याच्या मदतीने तुम्ही सीएनजी कारचे मायलेज वाढवू शकता.
सीएनजी कारचे मायलेज वाढवण्यासाठी टिप्स
1- फिल्टर स्वच्छ ठेवावा- सीएनजी कारचे मायलेज वाढण्यासाठी सर्वप्रथम कारच्या एअर फिल्टर ची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. तुम्ही प्रत्येक पाच हजार किमी प्रवासात कारचे एअर फिल्टर बदलले पाहिजे. कारण सीएनजी हवेपेक्षा हलका असल्याने एअर फिल्टर बदलणे आवश्यक आहे.
चांगल्या मायलेज साठी हवा आणि सीएनजी चे गुणोत्तर योग्य असणे गरजेचे असते. त्यामुळे एअर फिल्टर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे.
2- स्पार्क प्लग बदलणे- सीएनजी कार चे इग्निशन तापमान पेट्रोल कार पेक्षा जास्त असते.त्यामुळे सीएनजी कार मध्ये शक्तिशाली स्पार्क प्लग वापरावेत.
तुम्हाला कार मध्ये समान कोडचा स्टार प्लगचा योग्य संख्या असल्याची खात्री करावी लागते.त्याच वेळी कारची उष्णता श्रेणी देखील कंपनीच्या नियमानुसार असावे. चांगल्या स्पार्क प्लगमुळे सीएनजी आणि हवेच्या मिश्रणाची चांगली प्रज्वलन होते. यामुळेदेखील कारचे मायलेज सुधारते.
3- टायरचा प्रेशर तपासणे- टायरचा प्रेशर नेहमी तपासणे गरजेचे आहे. योग्य टायर प्रेशर सीएनजी कारचे मायलेज सुधारण्यासाठी आवश्यक आहे.
खासकरून उन्हाळा आणि हिवाळ्यात टायरचा प्रेशर तपासणे गरजेचे आहे. टायरमध्ये हवा कमी असेल तर गाडीवर जास्त दाब येतो त्यामुळे सीएनजीचा जास्त वापर होतो. चारही टायरचा हवेचा दाब योग्य ठेवणे फायद्याचे आहे.
नक्की वाचा:सर्वसामान्यांना मोठा झटका; CNG - PNG च्या दरात झाली मोठी वाढ, पहा नवीन दर...
4- कारचा क्लच-कारचा क्लच एक ग्रीसिंग डिस्क आहे.हे कारच्या ट्रान्समिशन मध्ये घडते.जुन्या झालेला क्लच कारचे मायलेज कमी करू शकतो.
कारण ते इंजिनची शक्ती चाकांकडे जाण्यापासून थांबते. त्यामुळे सीएनजी कारचे मायलेज खराब होऊन सीएनजी वाया जातो. म्हणूनच कारचा क्लच योग्य आणि चांगल्या स्थितीत असावा.
5- गॅस गळती तपासा- जर कारमध्ये गॅस लीक होत असेल तर कारचे मायलेज नक्कीच कमी होईल.कार मधील छोटासा लीक देखील कारचे मायलेज कमी करू शकतो.
त्यामुळे कार मध्ये गॅस डिटेक्टर बसवणे खूप चांगले होईल. त्यामुळे तुम्हाला कार मधील गॅसचा छोटासा लीक देखील कळेल. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून देखील ते फायद्याचे आहे.
नक्की वाचा:Best CNG Cars: 'या' आहेत सर्वाधिक मायलेज देणाऱ्या स्वस्त सीएनजी कार; जाणून घ्या...
Published on: 20 July 2022, 02:23 IST