Automobile

भारतीय ऑटो मार्केटमध्ये दुचाकी आणि स्कूटर चा मोठा वाटा असून भारतात स्कूटरची लोकप्रियता काही नवीन नाही.बाईकने काही काळासाठी आपले वर्चस्व गमावले असले तरी त्या पुनरागमन करत असून मोठ्या चाकांच्या दुचाकीने बाजारपेठेत त्यांचा योग्य वाटा मिळवला आहे. या सगळ्या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी हिरो, होंडा, टीव्हीएस आणि सुझुकी इत्यादी बाईक उत्पादकांनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण बाइक बाजारात आणल्या आहेत.

Updated on 26 July, 2022 6:38 PM IST

भारतीय ऑटो मार्केटमध्ये दुचाकी आणि स्कूटर चा मोठा वाटा असून भारतात स्कूटरची लोकप्रियता काही नवीन नाही.बाईकने काही काळासाठी आपले वर्चस्व गमावले असले तरी त्या पुनरागमन करत असून मोठ्या चाकांच्या दुचाकीने बाजारपेठेत त्यांचा योग्य वाटा मिळवला आहे. या सगळ्या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी हिरो, होंडा, टीव्हीएस आणि सुझुकी इत्यादी बाईक उत्पादकांनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण बाइक बाजारात आणल्या आहेत.

बाईकच्या बाजारामध्ये भरपूर पर्याय उपलब्ध आहेत परंतु  परवडणाऱ्या किमतीत मिळणे हा एक मोठा प्रश्न आहे. या लेखात आपण भारतात जास्त प्रमाणात विकल्या जाणाऱ्या  स्वस्त स्कूटर बद्दल माहिती घेणार आहोत.

 125cc इंजिन क्षमता असलेल्या भारतातील टॉप स्कूटर्स

1- हिरो डेस्टिनी 125- ही भारतीय बाजारपेठेतील सर्वात परवडणारी स्कूटर म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या स्कूटरची एक्स शोरूम किंमत 70 हजार 400 रुपये असून या स्कूटरच्या टॉप अँड व्हेरीयंट ची एक्स शोरूम किंमत 75 हजार 900 रुपयांपर्यंत जाते.

नक्की वाचा:Bike News: शेतकरी राजांची आवडती सुपर स्प्लेंडर आता नवीन अवतारात लॉन्च, जाणून घ्या किंमत

2- होंडा एक्टिवा 125- भारतीय बाजारपेठेतील सर्वात प्रसिद्ध स्कूटर पैकी एका असून तिची किंमत 74 हजार 989 रुपये ( एक्स शोरूम ) आहे. या किफायतशीर किमती साठी स्कूटरला फ्रंट ग्लोव्ह बॉक्स, स्टार्ट स्टॉप बटन, एलईडी हेडलॅम्प आणि डिस्क ब्रेक यासारखी अनेक वैशिष्ट्ये मिळतात.

3- हिरो मेस्ट्रो एज 125- भारतीय बाजारपेठेत या स्कूटर ची किंमत 75 हजार 450 रुपये एक्स शोरूम पासून 84 हजार 320 रुपये एक्स शोरूम किंमतीपर्यंत विकली जाते.

या स्कूटरला डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, ब्लूटूथ कनेक्टिविटी, कॉल अलर्ट आणि नेव्हिगेशन यासारख्या वैशिष्ट्यांसह आकर्षक डिझाइन मिळते.

नक्की वाचा:भारीच की! MG भारतात करणार सर्वात छोटी इलेक्ट्रिक कार लॉन्च, किंमत कमी, लूकही जबरदस्त

4- सुजुकी एक्सेस 125- भारतात सुरूवातीच्या प्रकारासाठी 75 हजार 600 रुपयांच्या एक्स शोरूम किमतीत विकली जाते.

जर तुम्हाला या स्कूटरमध्ये अधिक वैशिष्ट्ये हवे असतील तर तुम्ही आलोय फील आणि डिस्क ब्रेक सह नवीन एडिशन खरेदी करू शकतात.

यामध्ये सुझुकी राइड कनेक्ट, एलईडी हेडलंप आणि इतर फीचर्स उपलब्ध आहेत. या स्कूटरची एक्स शोरूम किंमत 85 हजार दोनशे रुपये आहे.

नक्की वाचा:Electric Scooter : पेट्रोल पासून होईल मुक्तता! घ्या सर्वाधिक विक्री होणारी जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर

English Summary: this is top 4 120 cc scooter in india and they are give a lot of feature
Published on: 26 July 2022, 06:38 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)