Automobile

सध्या सणांचे दिवस तोंडावर आले असून घटस्थापना किंवा दिवाळीच्या मुहूर्तावर बरेचजण नवीन वाहने घेण्याच्या तयारीत असतात. कुठलेही वाहन घेताना आपण परवडणाऱ्या किमतीत आणि चांगली वैशिष्ट्य असणाऱ्या वाहनाच्या शोधात असतो.या कालावधीमध्ये वाहनांच्या शोरूममध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होते.ज्या व्यक्तींना सणासुदीच्या काळामध्ये चांगली परफार्मन्स बाईक परवडणाऱ्या किमतीमध्ये घ्यायचे असेल तर या लेखात आपण अशा काही महत्त्वाच्या बाईकची माहिती घेणार आहोत.

Updated on 25 September, 2022 1:32 PM IST

सध्या सणांचे दिवस तोंडावर आले असून घटस्थापना किंवा दिवाळीच्या मुहूर्तावर बरेचजण नवीन वाहने घेण्याच्या तयारीत असतात. कुठलेही वाहन घेताना आपण परवडणाऱ्या किमतीत आणि चांगली वैशिष्ट्य असणाऱ्या वाहनाच्या शोधात असतो.या कालावधीमध्ये वाहनांच्या शोरूममध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होते.ज्या व्यक्तींना सणासुदीच्या काळामध्ये चांगली परफार्मन्स बाईक परवडणाऱ्या किमतीमध्ये घ्यायचे असेल तर या लेखात आपण अशा काही महत्त्वाच्या बाईकची माहिती घेणार आहोत.

नक्की वाचा:या 3 स्वस्त इलेक्ट्रिक कार्स लवकरच भारतात लॉन्च होणार, बजेट कमी असले तरी टेन्शन नाही...

एक लाखापेक्षा कमी किमतीत मिळणाऱ्या दमदार बाईक्स

1- होंडा एसपी 125- आपण या बाईकचा विचार केला तर ही सर्वाधिक विकली जाणारी बाईक असून या बाईकमध्ये 125 सीसी क्षमतेचे इंजिन देण्यात आला आहे. या बाईकचे वैशिष्ट्य म्हणजे ती अवरेज अर्थात मायलेज आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत खूप जबरदस्त आहे.

ही बाईक तुम्हाला डिस्क आणि ड्रम ब्रेक मॉडेलमध्ये मिळते. या बाईक मध्ये 124 सिंगल सिलेंडर एअर कुलर bs6 इंजिन देण्यात आली असून 5 स्पीड गिअर बॉक्ससह येते तिच्यात 18 इंचाचे ट्यूबलेस टायर आहेत.

2- टीव्हीएस रायडर 125- ही जबरदस्त आणि स्टायलिश दिसणारी बाईक असून तिच्यामध्ये एलईडी हेडलॅम्प, एलईडी डीआरएल, ब्लूटूथ कनेक्टव्हिटी, ट्यूबलेस टायर आणि डीस्क ब्रेक देण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे ही बाईक टीव्हीएस कंपनीची 125cc मधील पहिली बाईक आहे. या बाईकचे वैशिष्ट्य म्हणजे ही किक आणि सेल्फ स्टार्ट अशा दोन्ही ऑप्शनमध्ये येते. या बाईकला सतरा इंचाचे ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत.

नक्की वाचा:Honda Activa : जबरदस्त ऑफर ! सणासुदीला होंडा ऍक्टिवा फक्त 8 हजारात घरी घेऊन जा, ऑफर आधी समजून घ्या

3- हिरो सुपर स्प्लेंडर- आपल्याला माहित आहेच कि, हि देशात सर्वाधिक विकली जाणारी बाईक असून ही रेगुलर व्हेरिएंटमध्ये ब्लॅक ऍक्सेन्ट मध्ये देखील सादर केली आहे.

ही डिस्क आणि ड्रम ब्रेक अशा दोन्ही व्हेरिएंटमध्ये आहे. या बाईक मध्ये bs6 124.7 सिसी सिंगल सिलेंडर एअर कुल्ड इंजन दिले आहे. या बाईकची किंमत 70 हजार पाचशे रुपये असून यामधील टॉप मॉडेलची किंमत 81 हजार 630 रुपये आहे.

4- हिरो ग्लॅमर 125 Xtec- ही एक लोकप्रिय बाईक असून तिच्यामध्ये दमदार इंजिन आणि दमदार मायलेज देखील मिळते. यामध्ये एलईडी हेडलाईट, फुल्ल डिजिटल डिस्प्ले आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि इतर खूप जबरदस्त वैशिष्ट्ये देण्यात आले आहे.

ही बाईक तुम्हाला डिस्क आणि ड्रमब्रेक अशा दोन्ही मॉडेलमध्ये मिळते. जर तुम्हाला ड्रम व्हेरिएंट घ्यायचे असेल तर तिची किंमत 84 हजार दोनशे वीस रुपये इतकी आहे व डिस्क ब्रेक घ्यायची असेल तर किंमत 88 हजार आठशे रुपये आहे. या किमती एक्स शोरूम आहेत.  या बाईकमध्ये 5 स्पीड गिअर बॉक्स देण्यात आले आहे.

नक्की वाचा:यामाहा कंपनीने केले AEROX 155 चे मॉन्स्टर एनर्जी मोटोजीपी एडिशन लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

English Summary: this is so important and attractive bike in affordable price can you get in festive session
Published on: 25 September 2022, 01:32 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)