भारतातील टाटा मोटर्स ही कंपनी लवकरच इलेक्ट्रिक कार आणणार आहे असे सूत्रांच्या माहितीनुसार समोर आले आहे. टाटा कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाने अशी माहिती दिली आहे की आमची कंपनी लवकरच बाजारात नवीन इलेक्ट्रिक कार आणणार आहे जे की त्याची किंमत ही १२.५० लाख रुपये पेक्षा कमी असणार आहे. जे की एक हॅचबॅक कार असेल. टिगोर ईव्ही पेक्ष्या कमी किंमत या इलेक्ट्रिक कार ची असणार आहे.
टाटा विशेष योजनेवर काम करत आहे :-
सध्या पाहायला गेले तर ऑटो सेक्टर मध्ये ईव्ही कार दिवसेंदिवस फेमस होत चालली आहे जे की लोकांचा कल सुद्धा त्याकडे ओळलेला आहे. २०१९ या आर्थिक वर्षांमध्ये जवळपास दोन हजारहुन जास्तच ईव्ही वाहनांची विक्री झालेली आहे तर यावर्षी आत्ताच्या स्थिती पर्यंत २० हजार ईव्ही वाहने विकली गेली आहेत. सध्या २०२२ या आर्थिक वर्षांमध्ये जवळपास ५० हजार वाहनांची विक्री होऊ शकते असा अंदाज लावलेला आहे.
हेही वाचा:-यंदा च्या साली सोयाबीनच्या उत्पादनात ५२ टक्के घटीची शक्यता, उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट
टाटा कंपनीचा आहे हा उद्देश :-
टाटा कंपनीने आत्तापर्यंत १७ हजार पेक्षा जास्त वाहने विकलेली आहेत जे की आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ५० हजार ईव्ही वाहने विकण्याचा उद्देश केलेला आहे. जे की यासाठी सानंद प्लांट मधून तीन लाख युनिट्स ची जास्त क्षमता कंपनी प्रयत्न करत आहे.
हेही वाचा:-यामाहा कंपनीचे पेट्रोल इथेनॉल वर चालणारी दुचाकी ब्राझील मध्ये सज्ज, भारतात येतेय लवकरच...
टाटा ईव्ही कार :-
सध्या टाटा मोटर्स भारतामध्ये दोन ईव्ही कार विकते जे की यामध्ये टाटा नेक्सॉन आणि टिगोर यांचा समावेश आहे. टिगोर ईव्ही एका चार्जिंग मध्ये 306 किमी जाऊ शकते. जे की ही ईव्ही केवळ 65 मिनिटांत शून्य ते 80 टक्के चार्ज होऊ शकते. तर दुसऱ्या बाजूला Nexon EV ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 12.49 लाख रुपये आहे. Nexon EV ची एक्स-शोरूम किंमत 14.99 लाख रुपये आहे आणि फास्ट चार्जरने फक्त 60 मिनिटांत 10 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज करता येतो.
Published on: 12 September 2022, 04:02 IST