Automobile

टाटा मोटर्सने बुधवारी त्यांच्या पुण्यातील रांजणगाव निर्मिती प्रकल्पातून त्यांच्या लोकप्रिय नेक्सॉन एसयूव्हीच्या 400,000 व्या युनिट्सची घोषणा केली आणि नवीन XZ+(L), XZ+(L) मॉडेल्स ही लॉन्च केले. Tata Nexon ही सर्वाधिक विकली जाणारी SUV आहे. जे की प्रत्येक महिन्याला गाड्यांच्या यादीमध्ये Tata Nexon चे नाव हे आलेले असतेच. अगदी जास्त विकणाऱ्या गाड्यांमध्ये Nexon चे नाव लागले जाते.

Updated on 21 September, 2022 3:55 PM IST

टाटा मोटर्सने बुधवारी त्यांच्या पुण्यातील रांजणगाव निर्मिती प्रकल्पातून त्यांच्या लोकप्रिय नेक्सॉन एसयूव्हीच्या 400,000 व्या युनिट्सची घोषणा केली आणि नवीन XZ+(L), XZ+(L) मॉडेल्स ही लॉन्च केले. Tata Nexon ही सर्वाधिक विकली जाणारी SUV आहे. जे की प्रत्येक महिन्याला गाड्यांच्या यादीमध्ये Tata Nexon चे नाव हे आलेले असतेच. अगदी जास्त विकणाऱ्या गाड्यांमध्ये Nexon चे नाव लागले जाते.

या कार सोबत होणार मुकाबला :-

Tata Nexon SUV पहिल्यांदा सप्टेंबर 2017 मध्ये देशात लॉन्च करण्यात आली होती. तेव्हापासून, नेक्सॉन सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये आघाडीवर आहे. त्यावेळी त्याची मुख्य स्पर्धा मारुती सुझुकी विटारा ब्रेझा SUV सोबत होती. पण नंतर स्पर्धा वाढली जे की Hyundai Venue, Mahindra XUV300 आणि Kia Sonet यांच्यासोबत प्रतिस्पर्ध्यांच्या वाढत्या यादीत सामील झाले आहेत.

यामुळे आहे फेमस nexon :-

भारतीय कार बाजारात नेक्सॉनची लोकप्रियता वाढवणाऱ्या काही प्रमुख घटकांमध्ये टाटा मोटर्स ही एसयूव्ही पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांसह देते. यासोबतच या दोन्ही इंजिनमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्यायही उपलब्ध आहे. या SUV ची किंमत देखील एक प्रमुख घटक आहे ज्यामध्ये Nexon ची किंमत सुमारे 7.50 लाख रुपये एक्स-शोरूम सुरू होते आणि 14 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.

हेही वाचा:-या रानभाज्या आरोग्यासाठी आहेत खूप फायदेशीर, फायदे ऐकून विश्वासच बसणार नाही, वाचा सविस्तर

 

नवीन व्हेरियंट ची किंमत :-

नव्याने लॉन्च केलेल्या XZ+(L) या मॉडेल ची किंमत 11.38 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. जे की यामध्ये वायरलेस चार्जर, हवेशीर लेदर सीट, एअर प्युरिफायर आणि ऑटो-डिमिंग IRVM सारखी वैशिष्ट्ये आहेत. हे मॉडेल नेक्सॉन डार्क एडिशनमध्ये देखील समाविष्ट करण्यात आला आहे. मात्र, गेल्या महिन्यात सादर करण्यात आलेल्या जेट एडिशनपेक्षा डार्क एडिशन वेगळी आहे.

हेही वाचा:-गुलाबी आणि पांढऱ्या पेरूमध्ये काय आहे फरक? चांगल्या आरोग्यासाठी करा या पेरुचे सेवन.

 

पसंतीची SUV :-

टाटा मोटर्सने सांगितले आहे की nexon जास्त शक्तीशाकी बनलेली आहे जे की भारतीय नागरिक Nexon ला खुप मोठ्या प्रमाणावर पसंद करत आहे. तीन लाख वरून चार लाख युनिट न्यायला सात महिने लागले. एवढेच नाही तर विक्री चार्ट मध्ये Nexon ने प्रथम स्थान मिळवले आहे. टाटा कंपनीने एका वृत्तपत्रात सांगितले आहे की Nexon भारतीय वाहन खरेदीदारांमध्ये पसंतीची SUV आहे.

English Summary: Tata Nexon New Variant Launched in India, Know Features
Published on: 21 September 2022, 03:55 IST