Automobile

सध्या इलेक्ट्रिक वाहनांचे पेव फुटले असून विविध प्रकारच्या बाईक्स आणि फोर व्हिलर्स इलेक्ट्रिक स्वरूपात अवतरत आहेत.इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीमध्ये अनेक नामांकित कंपन्या पुढे येत असून अनेक वैशिष्ट्यपूर्ण वाहनांची निर्मिती करत आहेत.

Updated on 08 July, 2022 11:59 AM IST

 सध्या इलेक्ट्रिक वाहनांचे पेव फुटले असून विविध प्रकारच्या बाईक्स आणि फोर व्हिलर्स इलेक्ट्रिक स्वरूपात अवतरत आहेत.इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीमध्ये अनेक नामांकित कंपन्या पुढे येत असून अनेक वैशिष्ट्यपूर्ण वाहनांची निर्मिती करत आहेत.

 या इलेक्ट्रॉनिक्स कार निर्मिती मध्ये टाटा मोटर्स देखील मागे नाही. टाटाने काही दिवसांअगोदर Nexon Ev Max इलेक्ट्रिक कार लॉन्च केली. या लेखामध्ये आपण या कारचे वैशिष्ट्ये जाणून घेऊ.

'Nexon Ev Max' कारची वैशिष्ट्ये

 टाटा मोटर्सने हे कार नुकतीच लॉन्च केली असून या कारचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य असे आहे की हे कार एकदा चार्ज केली की तब्बल 437 किलोमीटर पर्यंत धावण्यासाठी सक्षम आहे. तसेच या नेक्सन ईव्ही मॅक्स इलेक्ट्रिक कार मध्ये चला चार्जिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

नक्की वाचा:भारीच! आता तुमची Activa इलेक्ट्रिक करा, एका वेळेस १०० किमी चालणार...

ही कार 7.2kW AC फास्ट चार्जर सह नियमित चार्ज केली तर साडेसहा तासांमध्ये पुर्णपणे चार्ज केली जाऊ शकते. व्यावसायिकरित्या वापरल्या जाणाऱ्या 50 kW DC चार्जर सह ती केवळ 56 मिनिटात 80 टक्‍क्‍यांपर्यंत चार्ज होते.

या कारमध्ये पावरफुल बॅटरी देण्यात आली असून ती 40.5kWh लिथियम आयन बॅटरी पॅक मिळते. सध्या असलेल्या टाटा नेक्सॉन ईव्हीपेक्षा  33 टक्के जास्त बॅटरी क्षमतेची आहे.

 या कारचा टॉप वेग

ही कार जास्तीत जास्त 143 पी एस पावर जनरेटर करते. याशिवाय यात तुम्हाला 250 Nm इन्स्टंट टॉर्क मिळतो. या कारचे सगळ्यात महत्वाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अवघ्या नऊ सेकंदामध्ये ही 100 किमीचा वेग पकडते. या कारचा टॉप स्पीड देखील 140 किमी प्रति तास असेल.

नक्की वाचा:Scorpio:शेतकऱ्यांसाठी आहे 'हे'खास फीचर, स्कार्पिओ-एन आहे शेतकऱ्यांची राणी

 या कारची इतर वैशिष्ट्ये

 या कारमध्ये थोडेथोडके नव्हे तब्बल तीस नवीन फिचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये वेदररेट व्हेंटिलेटेड सीट, ज्वेलरी कंट्रोल नॉब,

वायरलेस चार्जिंग,ऑटो डिमिंग IRVM, स्मार्ट वॉच इंटिग्रेशन  आणि एअर पुरिफायर यांचा समावेश आहे.

 या कारची किंमत

 कंपनीने हे कार XZ+ आणि XZ+Lux या दोन प्रकारांमध्ये सादर केली असून यामध्ये दोन चार्जिंग पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत. या ईव्हीची एक्स शोरूम किंमत 17.74 लातूर पासून 19.24लाख रुपयांपर्यंत जाईल.

नक्की वाचा:एकदा चार्ज केल्यावर 7 महिने चालणार ही कार, जाणून घ्या..

English Summary: tata nexon ev max electric car in once charge go 437 km
Published on: 08 July 2022, 11:59 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)