Automobile

नवी मुंबई: मारुती सुझुकी इको ही मारुती कंपनीची एक बेस्ट सेलिंग कार आहे. ही भारतीय बाजारपेठेतील एक लोकप्रिय आणि मध्यमवर्गीयांची आवडीची MPV कार आहे. यामध्ये कंपनी अधिक स्पेससह अनेक आधुनिक फीचर्स प्रदान करते, शिवाय ही कार चांगलं दमदार मायलेज देखील देण्यास सक्षम आहे.

Updated on 18 May, 2022 10:07 PM IST

नवी मुंबई: मारुती सुझुकी इको ही मारुती कंपनीची एक बेस्ट सेलिंग कार आहे. ही भारतीय बाजारपेठेतील एक लोकप्रिय आणि मध्यमवर्गीयांची आवडीची MPV कार आहे. यामध्ये कंपनी अधिक स्पेससह अनेक आधुनिक फीचर्स प्रदान करते, शिवाय ही कार चांगलं दमदार मायलेज देखील देण्यास सक्षम आहे.

बाजारात या लोकप्रिय MPV कारची सुरुवातीची किंमत 4 लाख 63 हजार आहे जी 5 लाख 94 हजारपर्यंत जाते. ही MPV अतिशय कमी किमतीत विक्रीसाठी ऑनलाइन वापरलेल्या वाहन डीलरच्या वेबसाइटवर पोस्ट केले गेले आहे. ही कार तुम्ही या वेबसाइट्सवरून अगदी कमी किमतीत खरेदी करू शकता.

Sarkari Yojana Information: 'या' सरकारी योजनेचा लाभ घ्या; 1 रुपयात मिळणार 2 लाखांचा विमा; वाचा सविस्तर

कार ट्रेड वेबसाइटवर ऑफर:

Maruti Suzuki Eeco 2011 मॉडेलवरील सर्वोत्तम सौदे CAR TRADE वेबसाइटवरून अगदी कमी किमतीत खरेदी केले जाऊ शकतात. या MPV ची किंमत येथे 1 लाख ठेवण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की ही कार खरेदी करण्यासाठी येथे कोणत्याही प्रकारचा फायनान्स प्लॅन ऑफर केला जात नाही.

आनंदाची बातमी! पोस्ट ऑफिसच्या या योजनेतून मिळतील 29 हजार 700 रुपये; वाचा याविषयी

मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यू वेबसाइटवर ऑफर:

MARUTI SUZUKI TRUE VALUE वेबसाइटवर अतिशय कमी किमतीत ही मारुती सुझुकी इको विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. या साईटवर 2012 मॉडेल सर्वोत्तम डीलमध्ये खरेदी करण्याची एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या वेबसाईटवर या धाकडं MPV ची किंमत 1 लाख 15 हजार एवढी ठेवण्यात आली आहे. कंपनी या MPV वर सहा महिन्यांची वॉरंटी, तीन सेर्विसिन्ग मोफत तसेच फायनान्स देखील करून देत आहे.

Electric Car: एकदा चार्ज केली की 528 किलोमीटर धावते ही कार; जाणुन घ्या या कारची किंमत आणि फिचर्स

कारवाले वेबसाइटवर ऑफर:

Maruti Suzuki Eeco 2011 मॉडेलची गाडी CARWALE वेबसाइटवरून अतिशय कमी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या MPV ची किंमत येथे 1 लाख 10 हजार ठेवण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की ही कार खरेदी करण्यासाठी येथे कोणत्याही प्रकारचा फायनान्स प्लॅन ऑफर केला जात नाही.

English Summary: Take home a Maruti Eco for Rs 1 lakh; Learn how
Published on: 18 May 2022, 10:07 IST