आता तुम्हाला कोणतीही कार खरेदी करण्याची गरज नाही. त्याऐवजी थेट कंपनीचा ‘सबस्क्रिप्शन प्लॅन’ घेऊन दर महिन्याला तुम्ही तुमची आवडती गाडी भाड्याने घेऊन फिरण्याची हौस भागवू शकता..आपली आवडती कार पाहिजे तितके दिवस वापरता येणार असल्याचंही सांगण्यात आलं.
नोकरीनिमित्त एक-दोन वर्षांसाठी स्थलांतरित होणाऱ्या नोकरदारांसाठी ही योजना उत्तम आहे.This scheme is best for employees.कार सब्सक्रिशन घेण्यासाठी डाउन पेमेंट किंवा ईएमआय (EMI) भरावा लागणार नाही. त्याऐवजी दर महिन्याला ‘सबस्क्रिप्शन’चे पैसे द्यावे लागतील. या योजनेत तुम्ही 6 महिन्यांत 6 वेगवेगळ्या कार भाड्याने घेऊ शकता.
कंपनीचा ‘सबस्क्रिप्शन प्लॅन’ निवडल्यानंतर फक्त भाडे भरावे लागेल.. इतर शुल्क भरावं लागणार नाही..तुम्हाला ‘सबस्क्रिप्शन प्लॅन’ कधीही वाढवता येईल..सबस्क्रिप्शन प्लॅन’ संपल्यावर कंपनी स्वत:हून तुमच्याकडून गाडी घेऊन जाईल. नंतर तुम्हाला परत सबस्क्रिप्शन प्लॅन घ्यावा लागेल..
विविध कारचे सबस्क्रिप्शन प्लॅनहुंदाई सँट्रो (दरमहा रक्कम)एका महिना- 27,399 रुपयेदोन महिने- 26,799 रुपयेसहा महिने – 21,999 रुपयेएका वर्ष- 21,099 रुपयेदोन वर्ष – 20,099 रुपयेचार वर्ष – 15,850 रुपये (दरमहा)हुंदाई क्रेटा (Hyundai Creta)एक महिना – 43,499 रुपयेदोन महिने – 42,999 रुपयेसहा महिने – 36,599 रुपयेएक वर्ष – 35,999 रुपयेदोन वर्ष – 35,099 रुपये (दरमहा)
मारूती सुझुकी व्हिटारा ब्रेझा (Vitara Brezza)एक महिना – 33,899 रुपयेदोन महिने – 33,299 रुपयेसहा महिने – 28,099 रुपयेएक वर्ष – 27,699 रुपयेदोन वर्ष – 26,699 रुपयेमहिंद्रा स्कॉर्पिओ (Mahindra Scorpio)एक महिना – 41,099 रुपयेदोन महिने – 40,699 रुपयेसहा महिने – 34,799 रुपयेएक वर्ष – 33,899 रुपयेदोन वर्ष – 32,999 रुपये
होंडा अमेझ (Honda Amaze)एक महिना – 27,599 रुपयेदोन महिने – 26,999 रुपयेसहा महिने – 22,499 रुपयेएक वर्ष – 21,599 रुपयेदोन वर्ष – 20,599 रुपयेसमजा, तुम्ही 4 वर्षांसाठी हुन्दाई सँट्रो (Hyundai Santro) कार भाड्याने घेतली, तर तुम्हाला दर महिन्याला 15,850 रुपयांचा हप्ता भरावा लागेल.. दुसरीकडे ही कार खरेदी केल्यास, 4 वर्षांसाठी कमीत कमी 14,193 रुपयांचा ‘ईएमआय’ भरावा लागेल. शिवाय 27,025 रुपयांचं डाऊनपेमेंट करावं लागतं..
Published on: 06 August 2022, 09:36 IST