Automobile

कार प्रेमींसाठी एक आनंदाची गोष्ट आहे, ह्युंदाई मोटर इंडियाच्या आगामी ह्युंदाई टक्सन २०२२ (SUV Hyundai Tucson 2022) कार लवकरच लाँच केली जाणार आहे. ह्युंदाई इंडियाने या कारसाठी बुकिंग्स घेण्यास सुरुवात केली आहे. ग्राहक ही एसयूव्ही ऑनलाईन बुक करू शकतील. तसेच तुम्ही जवळच्या ह्युंदाई डीलरशिपला भेट देऊन ही कार बुक करू शकता. ग्राहक ५० हजार रुपये भरून ही कार प्री-बूक करू शकतील. कंपनी ४ ऑगस्ट रोजी या कारची किंमत जाहीर केली जाणार आहे.

Updated on 18 July, 2022 9:28 PM IST

नवीन ह्युंदाई टक्सन शानदार आणि सेगमेंट फर्स्ट फीचर्ससह सादर केली जाणाार आहे. ही कार मिड साईज एसयूव्हींच्या सेगमेंटमध्ये इतर स्पर्धकांना मोठं आव्हान निर्माण करेल अशी आशा कंपनीला आहे. 

हेही वाचा : Royal Enfield: रॉयल एनफिल्ड लवकरच स्वस्त आणि स्टायलिश बाईक लाँच करणार, वाचा

अनेक सेफ्टी फीचर्स

या कारच्या सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास यात ६ एअरबॅग्ज (समोरच्या बाजूला ड्युअल एअरबॅग्स, साइड आणि कर्टन एअरबॅग्ज) देण्यात आल्या आहेत. तसेच यात फ्रंट आणि रिअर पार्किंग सेन्सर्स, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, हिल डिसेंट कंट्रोल, हिल असिस्ट कंट्रोल यांसारख्या हायटेक फीचर्ससह ही कार सुसज्ज असेल. तसेच यात डिस्क ब्रेक सिस्टिम देण्यात आली आहे.

शानदार लूक

ह्युंदाई कंपनीने नवीन टक्सनच्या लूकवर विशेष मेहनत घेतली आहे. या कारची लांबी ४६३० मिमी इतकी असेल. या सेगमेंटमधील ही सर्वात लांब कार असेल. त्यामुळे कंपनीने या कारमध्ये मोठी बूट स्पेस दिली आहे. तसेच या कारला व्हीलबेस देखील चांगला असेल. डार्क क्रोम पॅरामेट्रिक फ्रंट ग्रिल या कारच्या स्पोर्टी आणि डायनॅमिक इमेजमध्ये भर घालते तर फ्रंट स्किड प्लेट्समुळे या कारला अधिक बोल्ड लूक मिळतो.

English Summary: Show off your relatives with the Hyundai Tucson; Booking Start, know the price ?
Published on: 18 July 2022, 09:28 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)