खूप दिवसांपासून भारतातील लोकांना बुलेट चालवायला खूप आवडते. जे की सूत्रांच्या माहितीनुसार Royal Enfield लवकरच भारतीय बाजारात मजबूत इंजिनसह Scrambler 650 लाँच करू शकते. कंपनीने या मोटरसायकलवर बरेच काम केले आहे. त्यानंतर त्याचा लुक, इंजिन चांगले झाले आहे. जे की भारतातील लोकांना बुलेट म्हणजे जीव व प्राण आहे. कोणतीही बुलेट मार्केट मध्ये आली की लगेच भारतीय लोकांची बुकिंग त्या गाडीसाठी चालू होते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ही बुलेट ६५० cc आहे म्हणजे नक्कीच दमदार असणार आहे.
डिझाइन काशी आहे' :-
सूत्रांच्या माहितीनुसार, Scrambler 650 भारतात Royal Enfield द्वारे लाँच केली जाणार आहे या गाडीच्या चाचणी दरम्यान ही मोटरसायकल दिसली आहे. मोटरसायकलमध्ये टियरड्रॉप डिझाइनची इंधन टाकी देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने त्याच्या लुकवर खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळे मोटारसायकलचा लूक आणि डिझाईन खूपच छान दिसते. जव की या गाडीची पेट्रोल टाकी खूप रॉयल दिसत आहे व एवढेच नाही तर टाकीचा रंग सुद्धा असा आहे की अगदी उठावपणे दिसत आहे. या गाडीच्या डिझाईन वर कंपनीने खूप काम केले आहे.
हेही वाचा:-Komaki ने भारतात लाँच केली हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या किती आहे किंमत
इंजिन :-
या गाडीच्या नावानुसार, मोटरसायकलचे इंजिन 650 cc असेल. हे 648 cc समांतर ट्विन इंजिन असेल. कंपनी इंटरसेप्टर आणि कॉन्टिनेंटल जीटी सारख्या मोटरसायकलमध्ये देखील हे इंजिन देते. या इंजिनमधून मोटरसायकलला 47 bhp आणि 52 न्यूटन मीटर टॉर्क मिळतो. जे की या 650 cc च्या दमदार इंजिनममुळे गाडी चालवताना एक वेगळाच अनुभव तयार होणार आहे. अगदी गाडीची धाव देखील खूप जोरदार असल्याचे आपणास समजत आहे.
हेही वाचा:-भारतात लवकरच लॉन्च होणार मोठ्या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या संपूर्ण माहिती
फीचर्स आणि कधी होईल लाँच :-
सूत्रांच्या माहितीनुसार मोटरसायकलच्या दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेक दिले जाऊ शकतात. याशिवाय ड्युअल चॅनल एबीएस, यूएसडी फोर्क्स, ड्युअल शॉक अॅब्सॉर्बर्स, इलेक्ट्रिक स्टार्ट, ट्विन पॉड इन्स्ट्रुमेंट कन्सोल, राउंड लाइट्स, सिंगल पीस सॅडल यांसारखी वैशिष्ट्ये असू शकतात. जे की ही गाडी पुढील वर्षी 2023 मध्ये ही मोटरसायकल लॉन्च केली जाऊ शकते. सध्या कंपनीने लाँच बाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.
Published on: 07 October 2022, 02:15 IST