Royal Enfield ही एक प्रमुख भारयीय टू व्हिलर निर्माती कंपनी आहे. या कंपनीची Royal Enfield Meteor 350 ही एक प्रीमियम क्रूझर बाईक म्हणून ग्राहकांच्या पहिल्या पसंतीस खरी उतरली आहे. ही बाईक या विभागातील एक लोकप्रिय बाइक म्हणून संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात खरेदी केली जातं आहे.
या बाईकमध्ये कंपनीने उत्कृष्ट लुक उपलब्ध करून दिले आहेत शिवाय या बाईकचे इंजिनही चांगले मजबूत आहे. यामुळे ही बाईक नव युवकांना विशेष आकर्षित करीत आहे.
ही बाईक लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अधिक फायद्याची असल्याचा दावा केला जातो. ही बाईक लॉन्ग रूटसाठी चालवायला खुपच आरामदायी आहे.
कंपनीने या बाईकचे स्टेलर व्हेरियंट भारतीय बाजारपेठेत सादर केले आहे ज्याची भारतीय बाजारपेठेत प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 2,07,333 रुपये एवढी आहे. या बाइकची ऑन रोड किंमत जवळपास 2,34,444 एवढी आहे. तुम्ही देखील रॉयल इन्फिल्डचे जबरा फॅन असाल आणि या कंपनीची ही बाईक तुम्हाला खरेदी करायची असेल तर आजची ही बातमी विशेष तुमच्यासाठी.
कारण की आज आम्ही तूम्हाला या बाईकवर उपलब्ध एका ऑफर विषयी माहिती देणार आहोत. मित्रांनो आज आम्ही तुम्हाला या बाईकवर उपलब्ध असलेल्या फायनान्स सुविधेबद्दल माहिती देणार आहोत. चला तर मग जाणुन घेऊया याविषयी सविस्तर.
Royal Enfield Meteor 350 Stellar variant वर उपलब्ध फायनान्स सुविधा:
Royal Enfield Meteor 350 Stellar variant वर दिल्या जात असलेल्या फायनान्स प्लॅनबद्दल सांगायचे झाले तर, कंपनीची ही लोकप्रिय क्रूझर बाइक खरेदी करण्यासाठी तुम्हाला बँकेकडून ₹ 2,11,444 पर्यंत कर्ज मिळते. म्हणजेच ही बाईक खरेदी करण्यासाठी तुम्हाला केवळ 23,000 रुपये किमान डाउन पेमेंट म्हणून जमा करावे लागतील आणि बाकीची रक्कम तुम्ही सुलभ हप्त्यात परत करू शकता. कर्जाची परतफेड करण्यासाठी बँक 5 वर्षे म्हणजेच 60 महिन्यांची मुदत देते. या कालावधीत ₹6,433 चा मासिक EMI भरून कर्जाची परतफेड केली जाऊ शकते. बँकेने दिलेल्या या कर्जावर वार्षिक 9.7 टक्के दराने व्याज भरावे लागेल.
Royal Enfield Meteor 350 स्टेलर व्हेरिएंटचे स्पेसिफिकेशन:
Royal Enfield Meteor 350 स्टेलर व्हेरियंटमध्ये, कंपनीने एअर-कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित सिंगल सिलेंडर 349 cc इंजिन उपलब्ध करून दिले आहे. या इंजिनची शक्ती 20.4 PS कमाल शक्ती आणि 27 मिमी पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असल्याचा कंपनीचा दावा आहे. म्हणजेच कंपनीने या बाईक मध्ये दमदार एंजल उपलब्ध करून दिले आहे.
या इंजिनसह कंपनी तुम्हाला 5 स्पीड गिअरबॉक्स देते. ही बाईक 41.88 kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. विशेष म्हणजे हे मायलेज ARAI द्वारे प्रमाणित करण्यात आले आहे. कंपनीने या बाईकच्या पुढील आणि मागील दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेक्सचे संयोजन तसेच रॉयल एनफील्ड मेटिओर 350 स्टेलर व्हेरिएंट बाइकमध्ये ड्युअल चॅनल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम देखील उपलब्ध करून दिले आहे.
Published on: 09 June 2022, 10:35 IST