मित्रांनो जसे की आपणास ठाऊकचं आहे कोरोना विषाणू संसर्गाच्या तिन्ही लाटामध्ये ऑटोमोबाईल क्षेत्राचे मोठे नुकसान झाले होते. यामुळे अनेक वाहन निर्मात्या कंपन्यांना करोडो रूपयांचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला होता. अशा परिस्थितीत आता देशातील प्रमुख वाहन निर्मात्या कंपन्या या नुकसानीची भरपाई करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले जात आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रातील नामांकित कंपनी आता आपल्या कंपनीच्या वाहणांची विक्री वाढवण्यासाठी जोर देत आहे.
ऑटोमोबाईल कंपन्यांचे उद्दिष्ट एक प्रकारे ग्राहकांना आकर्षित करून आर्थिक नुकसान भरपाईची पूर्तता करणे आहे. दरम्यान, रॉयल एनफील्ड, या देशातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील नामांकित कंपनीने देखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही भन्नाट ऑफर सुरू केल्या आहेत. रॉयल एनफिल्ड कंपनीच्या बाईक देशातील तरुण वर्गाच्या पसंतीस खरे उतरत आहेत. या कंपनीच्या बाईकचे अनेक तरुण मोठे जबरे फॅन आहेत.
जर तुम्हाला देखील रॉयल एनफिल्ड कंपनीची बाईक खरेदी करायची असेल तर आजची ही बातमी विशेष तुमच्यासाठी. रॉयल एनफिल्ड आपल्या बाइकवर एक भन्नाट ऑफर घेऊन आली आहे. ज्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. कधी-कधी असं होतं की तुमची इच्छा असूनही तुम्ही रॉयल एनफिल्डची बाइक खरेदी करू शकत नाही, कारण त्यांची किंमत थोडी जास्त आहे.
मात्र आता असे होणार नाही कारण आता तुम्ही अगदी कमी बजेटमध्ये रॉयल एनफिल्ड बाईक सहज खरेदी करू शकता. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगतो की, ड्युअल एबीएस चॅनलसह रॉयल एनफील्ड क्लासिक 350 हॅल्सियन सीरीजची सुरुवातीची किंमत रु. 1,98,971 (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे जी ऑन-रोड रु. 2,20,558 पर्यंत जाते.
म्हणजेचं ही बाईक घेण्यासाठी तुम्हाला 2 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. मात्र जर तुमच्याकडे पुरेसा पैसा उपलब्ध नसेल तर आपण ही बाईक फायनान्स वर खरेदी करू शकता. ऑनलाइन डाउन पेमेंट आणि ईएमआय कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही ही बाईक खरेदी केली तर बँक यासाठी 1,98,558 रुपये कर्ज देईल. हे कर्ज मिळाल्यानंतर, तुम्हाला किमान डाउन पेमेंट म्हणून 22,000 रुपये जमा करावे लागतील आणि त्यानंतर दरमहा 6,041 रुपये EMI भरावे लागतील.
अर्थात तुम्ही केवळ बावीस हजार रुपये भरून रॉयल एनफिल्डची ही भन्नाट बाईक घरी घेऊन जाऊ शकता. Royal Enfield Classic 350 Halcyon Series वर ड्युअल ABS सह दिलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी बँकेने 36 महिन्यांचा कालावधी निश्चित केला आहे. या कालावधीत, बँक दिलेल्या कर्जाच्या रकमेवर वार्षिक 9.7 टक्के दराने व्याज आकारेल.
बाईकची वैशिष्ट्ये जाणून घ्या
या बाईकच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर या बाईकचे फिचर्स आपले मने जिंकणारे ठरणार आहेत. रॉयल एनफील्ड बाईकच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने यामध्ये 349.34 सीसी सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे. हे इंजिन 20.21 PS पॉवर आणि 27 Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत 5-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आले आहेत.
Published on: 28 June 2022, 04:40 IST