Automobile

Royal Enfield Bullet: रॉयल एनफिल्डची (Royal Enfield) बाईक रॉयल एनफील्ड बुलेट 350 तिच्या स्टाइलिश क्लासिक लुकसाठी पसंत केली जाते. या बाईकमध्ये कंपनी मजबूत इंजिनसह समाधानकारक मायलेज देते. कंपनीने या गाडीची बाजार किंमत ₹ 1.48 लाख ते ₹ 1.63 लाख दरम्यान निश्चित केली आहे. मात्र जर आपणास ही बाईक कमी किमतीत खरेदी करायची असेल तर आपण ही बाईक सेकंड हॅन्ड खरेदी करू शकता.

Updated on 25 July, 2022 7:20 PM IST

Royal Enfield Bullet: रॉयल एनफिल्डची (Royal Enfield) बाईक रॉयल एनफील्ड बुलेट 350 तिच्या स्टाइलिश क्लासिक लुकसाठी पसंत केली जाते. या बाईकमध्ये कंपनी मजबूत इंजिनसह समाधानकारक मायलेज देते. कंपनीने या गाडीची बाजार किंमत ₹ 1.48 लाख ते ₹ 1.63 लाख दरम्यान निश्चित केली आहे. मात्र जर आपणास ही बाईक कमी किमतीत खरेदी करायची असेल तर आपण ही बाईक सेकंड हॅन्ड खरेदी करू शकता.

अशा अनेक सेकंड हॅन्ड टू व्हीलर खरेदी विक्री करणाऱ्या वेबसाईट आहेत ज्या रॉयल इन्फिल्ड बुलेट कमी किमतीत उपलब्ध करून देतात. जर आपणास कमी बजेटमध्ये ही बाईक खरेदी करायची असेल तर आजची ही बातमी विशेष तुमच्यासाठी आहे. आपण रॉयल एनफिल्ड बुलेट मात्र 50 हजारात जुन्या दुचाकी खरेदी-विक्री करणाऱ्या वेबसाइटवरून ऑनलाइन खरेदी करू शकणार आहात. 

OLX वेबसाइटवर ऑफर:

Royal Enfield Bullet 350 बाईक OLX वेबसाइटवरून अतिशय कमी किमतीत खरेदी केली जाऊ शकते. कंपनीच्या या बाईकचे 2012 चे मॉडेल ₹ 45,000 च्या किमतीत विक्रीसाठी पोस्ट करण्यात आले आहे. ही बाईक खरेदी करण्यासाठी कंपनी कोणत्याही प्रकारचा फायनान्स प्लॅन देत नाहीये.

QUIKR वेबसाइटवर ऑफर:

रॉयल एनफील्ड बुलेट 350 बाईक QUIKR वेबसाइटवरून अगदी कमी किंमतीत खरेदी केली जाऊ शकते. कंपनीच्या या बाईकचे 2009 चे मॉडेल ₹ 50,000 च्या किमतीत विक्रीसाठी पोस्ट करण्यात आले आहे. ही बाईक खरेदी करण्यासाठी कंपनी कोणत्याही प्रकारचा फायनान्स प्लॅन देत नाहीये.

BIKEDEKHO वेबसाइटवर ऑफर:

Royal Enfield Bullet 350 बाईक BIKEDEKHO वेबसाइटवरून अतिशय कमी किमतीत खरेदी करता येईल.  या कंपनीच्या बाईकचे 2011 चे मॉडेल ₹ 50,000 च्या किमतीत विक्रीसाठी पोस्ट केले आहे. ही बाईक खरेदी करण्यासाठी कंपनी कोणत्याही प्रकारचा फायनान्स प्लॅन देत नाहीये.

या लोकप्रिय बाईकची वैशिष्ट्ये:

कंपनीने Royal Enfield Bullet 350 बाइकमध्ये 346 cc सिंगल सिलिंडर इंजिन दिले आहे. या इंजिनची शक्ती कमाल 19.36 PS ची पॉवर आणि 28 Nm चा पीक टॉर्क जनरेट करणारी आहे. त्यातील इंजिन 5-स्पीड गियरबॉक्स जोडलेले आहे. कंपनी या बाईकमध्ये ARAI द्वारे प्रमाणित 37 kmpl चा मायलेज देते.

English Summary: royal enfield bullet purchased bullet at 50 thousand
Published on: 25 July 2022, 07:20 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)