PMV EaS-E micro electric car: तुम्हीही स्वस्त इलेक्ट्रिक कारची वाट पाहत असाल, तर तुमचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च होणार आहे. मुंबईस्थित इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी PMV इलेक्ट्रिक आपली पहिली इलेक्ट्रिक कार भारतात आणणार आहे.
कंपनी 16 नोव्हेंबरला EaS-E नावाची मायक्रो इलेक्ट्रिक कार सादर करणार आहे. कंपनीने अधिकृतपणे या छोट्या कारचे प्री-बुकिंगही सुरू केले आहे. ग्राहक हे वाहन अधिकृत वेबसाइटवरून फक्त 2,000 रुपयांमध्ये बुक करू शकतात.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, वाचून तुम्हालाही आनंद होईल
वैशिष्ट्ये अशी असतील
आकाराने ही कॉम्पॅक्ट कार असेल, ज्यामध्ये 4 दरवाजे देण्यात आले आहेत. मात्र, समोर एकच आणि मागच्या बाजूला एकच सीट असेल. यामध्ये रिमोट पार्किंग असिस्ट, रिमोट की कनेक्टिव्हिटी, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, यूएसबी चार्जिंग पोर्ट आणि क्रूझ कंट्रोल यांसारखी वैशिष्ट्ये मिळतील.
प्रवाशांच्या सोयीसाठी, वाहनात स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, रिमोट कीलेस एंट्री, पॉवर विंडो आणि रिअर व्ह्यू कॅमेरा यांसारखी वैशिष्ट्ये देखील मिळू शकतात.
दीड महिन्यात सहावा मोठा प्रकल्प राज्याबाहेर; शेतकऱ्यांचा होणार मोठा तोटा
चार्जिंग आणि किंमत
३ किलोवॅट एसी चार्जरद्वारे हे वाहन ४ तासांपेक्षा कमी वेळेत पूर्ण चार्ज होऊ शकते असा कंपनीचा दावा आहे. त्याची बॅटरी 5-8 वर्षे टिकेल. या कारचा व्हीलबेस 2,087 मिमी असेल आणि ग्राउंड क्लीयरन्स 170 मिमी असेल.
ही कार तीन प्रकारात आणली जाऊ शकते, ज्यामध्ये 120 किमी, 160 किमी आणि 200 किमीची रेंज दिली जाईल. या वाहनाची किंमत 4 लाख ते 6 लाख रुपयांपर्यंत असू शकते. सध्या टाटा टिगोर ईव्ही ही सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे, ज्याची किंमत 8.49 लाख रुपयांपासून सुरू होते.
आता थेट साखर कारखान्यांवर होणार कारवाई; शेतकऱ्यांचा होणार फायदा, आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय
Published on: 12 November 2022, 04:58 IST