Automobile

अनेकदा आपल्याला बाहेर प्रवास करत असताना आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असते, पण प्रवासात सोबत घ्यायला विसरतो. आता मात्र वाहन चालक परवाना नसला तरी तुमचं चलन कापलं जाणार नाही.

Updated on 22 June, 2022 5:51 PM IST

अनेकदा आपल्याला बाहेर प्रवास करत असताना अनेक अडचणी येतात. यासाठी तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) म्हणजेच DL असणे आवश्यक आहे. ते जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला दंड होतो. तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसल्यास, पोलिस तुमचे चलन (Driving Licence Challan) कापून घेऊ शकतात. अशावेळी मोठा भुर्दंड बसण्याची शक्यता असते. मात्र, अनेकवेळा असे घडते की, आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असते, पण प्रवासात सोबत घ्यायला विसरतो.

अशा वेळी आपल्याला नेमके पोलीस पकडतात आणि मोठा दंड होतो. आता मात्र वाहन चालक परवाना नसला तरी तुमचं चलन कापलं जाणार नाही. ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय वाहन चालवल्यास 5000 रुपयांपर्यंत चलन कापलं जातं. यामुळे याची खिश्याला झळ बसते. आता आम्ही तुम्हाला असा एक मार्ग सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय आरामात प्रवास करू शकाल आणि पोलिस तुमचे चलन कापू शकणार नाहीत. मात्र, यासाठी तुम्हाला थोडी मेहनत करावी लागेल.

वास्तविक, सरकारचे एक मोबाइल अँप आहे, ज्याचे नाव आहे डिजीलॉकर (digilocker) असे आहे. डिजीलॉकरमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स अपलोड करा तुम्हाला तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स एकदा डिजीलॉकरमध्ये अपलोड करावं लागेल. डिजीलॉकरमध्ये तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स अपलोड केल्यानंतर, तुम्हाला तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स सोबत घेऊन जाण्याची गरज नाही, ते घरी सुरक्षितपणे ठेवा आणि प्रवास करा.

मोदींचे २ हजार मिळाले नसतील तर थेट 'या' नंबरवर फोन करून करा चौकशी, लगेच मिळतील पैसे...

यामुळे जेव्हा जेव्हा पोलीस तुम्हाला थांबवतील आणि तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स दाखवायला सांगतील तेव्हा ते डिजीलॉकरमध्ये अपलोड केलेलं DL दाखवा. यामुळे तुम्हाला दंड देखील बसणार नाही. हे एक सरकारी अँप आहे. यामध्ये भारतीय नागरिक त्यांच्या महत्त्वाची कागदपत्रे कागदविरहित पद्धतीने त्यांच्याकडे ठेवू शकतात या उद्देशाने तयार करण्यात आले आहेत. पोलिसांना देखील हे मान्य करावे लागते.

महत्वाच्या बातम्या;
कांद्याला प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे दर का? अमोल कोल्हे यांनी घेतला मोठा निर्णय
'ज्यांना सहकारी कारखाना काढता आला नाही त्यांनी खाजगी कारखाने काढले, त्यातील मी पण एक होतो'
आता पंजाबरावांनी जुलै महिन्यांचा अंदाज केला जाहीर, वाचा कधी पडणार नेमका पाऊस

English Summary: Now walk around without cutting the currency! Exemption from driving license
Published on: 22 June 2022, 05:51 IST