Electric Car: देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे हाल होत आहेत. तसेच इंधनाचे दरही (Fuel rates) गगनाला भिडले आहेत. त्यामुळे अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक कार बाजारात लॉन्च केल्या आहेत. त्यामुळे कुठेतरी पेट्रोल आणि डिझेलपासून सुटका मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. MG कंपनीने (MG Company) बाजारात एक सुंदर लूक असणारी इलेक्ट्रिक कार बाजारात लॉन्च करणार आहे.
भारतातील ऑटोमोबाईल (Automobile) मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहने वेगाने स्वीकारली जात आहेत. इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यात खरेदीदार रस दाखवत असून ऑटोमोबाईल कंपन्याही नवीन मॉडेल बाजारात आणत आहेत. आता या एपिसोडमध्ये आणखी एका मॉडेलची भर पडणार आहे. MG भारतात नवीन मॉडेल लॉन्च (New model launched) करण्याच्या तयारीत आहे. कंपनी हे मॉडेल परवडणारे मॉडेल म्हणून बाजारात आणणार आहे.
चीनच्या इलेक्ट्रिक कारवर आधारित
ही एक छोटी इलेक्ट्रिक कार असेल ज्याचे इंटीरियर अलीकडेच लीक झाले आहे. आता अशी शक्यता वर्तवली जात आहे की ही कार लवकरच भारतात लॉन्च केली जाऊ शकते. ही MG Small EV चीनच्या Wuling च्या Honguang EV वर आधारित असेल.
भावांनो कमी खर्चात कमवा चौपट नफा! करा हा व्यवसाय आणि बना लखपती
कधी लॉन्च होणार?
या कारच्या भारतातील लॉन्च बाबत कोणतीही निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नाही परंतु पुढील वर्षी 2023 ऑटो एक्सपोमध्ये ती सादर केली जाऊ शकते असे मानले जाते. कंपनीची MG ZS EV भारतातही खूप लोकप्रिय झाली आहे. सध्या, Tata Nexon EV ने भारतातील इलेक्ट्रिक कार सेगमेंट व्यापले आहे आणि लॉन्च झाल्यापासून ती नंबर 1 कंट्री कार राहिली आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर नवीन संकट! कांद्यावर वाढत आहे थ्रिप्स कीड; करा असा उपाय
MG ZS EV इलेक्ट्रिक कार विभागात चांगली कामगिरी करत आहे आणि कंपनीने गेल्या महिन्यात म्हणजे जून 2022 मध्ये 4,503 युनिट्सची विक्री केली होती. मे 2022 च्या तुलनेत कंपनीने या कारच्या विक्रीत 27 टक्के वाढ नोंदवली आहे आणि एवढेच नाही तर या SUV लाँच झाल्यापासून 5,000 हून अधिक युनिट्स विकल्या गेल्या आहेत. आता कंपनीची नवीन इलेक्ट्रिक कार भारतात या सेगमेंटमध्ये स्पर्धा तीव्र करू शकते.
महत्वाच्या बातम्या:
दूध उत्पादकांचे अच्छे दिन! दुभत्या जनावरांना खाऊ घाला चॉकलेट; दुधात होईल भरघोस वाढ
शेतकऱ्यांनो लखपती बनायचंय ना! तर बाजार प्रचंड मागणी असणारा हा शेतीव्यवसाय कराच...
Published on: 24 July 2022, 06:03 IST