Automobile

देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने मोठी घोषणा केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कंपनी 2025 मध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे. कंपनी 2024-25 मध्ये या कारचे उत्पादन सुरू करेल. कंपनीच्या गुजरातमधील प्लांटमध्ये या कारचे उत्पादन केले जाईल. आगामी काळात आपली उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी कंपनी दोन नवीन उत्पादन प्रकल्प उघडणार आहे.

Updated on 10 August, 2022 11:47 AM IST

देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने मोठी घोषणा केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कंपनी 2025 मध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे. कंपनी 2024-25 मध्ये या कारचे उत्पादन सुरू करेल. कंपनीच्या गुजरातमधील प्लांटमध्ये या कारचे उत्पादन केले जाईल. आगामी काळात आपली उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी कंपनी दोन नवीन उत्पादन प्रकल्प उघडणार आहे.

हरियाणातील सोनीपतमधील खरखोडा येथे हे प्लांट उघडण्यात येणार आहेत. यासाठी कंपनी 11 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. कंपनी 2025 मध्ये पहिले युनिट उभारणार आहे. काही काळानंतर दुसरे युनिट उभारले जाईल. कंपनीने अद्याप आपल्या पहिल्या ईव्हीचे तपशील उघड केलेले नाहीत. पहिल्या मारुती इलेक्ट्रिक कारची किंमत 10 लाखांपेक्षा जास्त असेल कारण ईव्ही तंत्रज्ञान आणि बॅटरी महाग आहेत.

नवीन ईव्ही जी बऱ्याच दिवसांपासून चाचणीत आहे ती बाजार-विशिष्ट आवश्यकता पूर्ण करेल आणि भारतीय हवामान परिस्थितीला अनुकूल असेल. अशी माहिती आहे की मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार मध्यम आकाराची एसयूव्ही असेल जी सुझुकी आणि टोयोटा सह विकसित केली जाईल. मॉडेल 2023 ऑटो एक्सपोमध्ये त्याच्या संकल्पना स्वरूपात पदार्पण करू शकते.

आता दुधाच्या रिकाम्या पिशवीवर मिळणार पेट्रोल डिझेलवर सूट, वाचा अनोखी ऑफर

इलेक्ट्रिक पॉवरट्रेनला सपोर्ट करणाऱ्या टोयोटाच्या मोठ्या प्रमाणात स्थानिकीकृत DNGA मॉड्यूलर प्लॅटफॉर्मवर ईव्हीची रचना केली जाईल. हे दोन बॅटरी पर्यायांसह उपलब्ध केले जाऊ शकते - 48kWh आणि 59kWh. हे दोन्ही पर्याय अनुक्रमे 400 आणि 500 ​​किमीची रेंज ऑफर करतील. मारुतीच्या या इलेक्ट्रिक कारची चर्चा भारतात खूप दिवसांपासून सुरू आहे. यामुळे ग्राहकांचे याकडे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या;
अशी वाईट परिस्थिती कोणाच्या वाट्याला न येवो! पैसे नसल्याने पाकिस्तानने विकायला काढले वाघ, सिंह
काझडमध्ये मोफत बियाणे वाटप, पोषणयुक्त आहारासाठी सरकारचा प्रयत्न, शेतकऱ्यांचा मोठा प्रयत्न
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या आमदारांचे बंधू शिवसेनेत, राष्ट्रवादीला मोठा धक्का..

English Summary: Maruti's first electric car launched soon, special features
Published on: 10 August 2022, 11:47 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)