मारुती सुझुकी ही कार निर्माण क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे. या कंपनीने वेगवेगळ्या प्रकारच्या कारची मॉडेल्स बाजारात आणून एक बाजारपेठ काबीज केली आहे.
मारुती सुझुकी लवकरच ब्रेझ्झा या तिच्या कारची नवीन सिरीज लॉन्च करणार आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये मारुती सुझुकीची ही एसयुव्ही कार अधिक चांगल्या लुकसोबत आणि वेगवेगळ्या वैशिष्ट्यांसह लॉन्च होणार आहे.
एक आरजुन लॉन्च झाली नसली तरी तिच्या अनेक वैशिष्ट्ये समोर आले आहेत ज्यामध्ये फॅक्टरी फिटेड सनरुफ, 360 डिग्री कॅमेरा, कनेक्टेड कार्बन तंत्रज्ञान आणि डुएल टोन कलर आलोय व्हील यांचा ब्रेजा च्या या नवीन अपडेटेड मॉडेल मध्ये समावेश आहे. या लेखात या कारची काही वैशिष्ट्ये जाणून घेऊ.
मारुती पहिली सनरुफ कार breeza ची वैशिष्ट्ये
या कारमध्ये फॅक्टरी फिटेड सनरुफ, नवीन फ्लोटिंग टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम तसेच वायरलेस चार्जिंग सिस्टम, ई सीम कनेक्टिव्हिटी आणि जिओ फेन्सिंग, रियल टाइम ट्रॅकिंग, फाइंड माय कार सह कनेक्ट केलेली कार वैशिष्ट्ये यामध्ये असू शकतो.
या कारमध्ये अनेक एअरबॅग सोबत इतर सेफ्टी फीचर्स देखील मिळतील. या कारची किंमत सात लाख 75 हजार पासून सुरू होऊ शकते. 2022 मारुती सुझुकी विटारा ब्रेझा च्या इंजिन पावर आणि काही वैशिष्ट्यं बद्दल बोलायचे झाले तर सध्याच्या मोडेल प्रमाणेच दीड लिटर चार सिलेंडर पेट्रोल इंजिन असेल.
जे 105 hp पावर आणि 138Nm टॉर्क जनरेट करेल. ब्रीजा चे सध्याचे मॉडेल मॅन्युअल तसेच चार स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक गेअर बॉक्स आहे. तसेच जनरल ब्रेजा मध्ये सा स्पीड आटोमॅटिक गियर बॉक्स दिसू शकतो. तसेच या कारच्या लुक बद्दल बोलायचे झाले तर याचे बंपर आणि हेडलाईट डिझाईन, नवीन क्लेमशेल स्टाईल आणि नवीन फेंडर्ससोबत पूर्णपणे बदलला आहे.
नवीन एस यू व्ही सध्याच्या मॉडेल च्या प्लॅटफॉर्मवर तयार केले जात आहेतसेच या कारच्या बॉडीशेलसह दरवाजे पूर्वीप्रमाणे ठेवण्यात आले आहे. तसेच मागील दरवाजा मध्ये बदल करण्यात आले आहेत. तसेच नंबर प्लेटची जागा बदलण्यात आली असून ती खालच्या बाजूस हलवण्यात आली आहे.
या कारला समोर आणि मागील बाजूस सेन्सर्स दिले आहेत. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने ही खूपच मजबूत आहे.
महत्वाच्या बातम्या
Published on: 23 May 2022, 10:24 IST