Automobile

मारुती सुझुकी या कार निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीने बुधवारी ग्रंड विटारा लॉन्च करून मध्यम आकाराच्या एसयुव्ही कारच्या क्षेत्रामध्ये प्रवेश केला. ग्राहकांना ही कार अकरा हजार रुपयांच्या प्रारंभिक पेमेंट सह प्री बुक करता येणार आहे. या नवीन कार ची स्पर्धा हुंडाई क्रेटा, Kia Seltos आणि टाटा हॅरियरशी होईल. टाटा विटारा लाइन अप मधील एस क्रॉस ची जागा घेईल अशी अपेक्षा आहे.

Updated on 21 July, 2022 10:36 AM IST

मारुती सुझुकी या कार निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीने बुधवारी ग्रंड विटारा लॉन्च करून मध्यम आकाराच्या एसयुव्ही कारच्या क्षेत्रामध्ये प्रवेश केला. ग्राहकांना ही कार अकरा हजार रुपयांच्या प्रारंभिक पेमेंट सह प्री बुक करता येणार आहे. या नवीन कार ची स्पर्धा हुंडाई क्रेटा, Kia Seltos आणि टाटा हॅरियरशी होईल. टाटा विटारा  लाइन अप मधील एस क्रॉस ची जागा घेईल  अशी अपेक्षा आहे.

 ग्रँड  विटाराची वैशिष्ट्य

 ही कार दोन पावर ट्रेनमध्ये ऑफर केले जाईल. यात दीड लिटर माइल्ड  हायब्रीड इंजिन आणि दीड लिटर पावरफुल हायब्रीड इंजिन असेल. सौम्य हायब्रीड इंजिन 100 bps आणि 135 Nm टॉर्क जनरेट करेल आणि 6 स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन ला जोडेल.

नक्की वाचा:Maruti Alto 800: आता अक्खा मार्केट गाजणार हाय…! लवकरच मारुती अल्टो नवीन अवतारात धुमाकूळ घालणार, किंमत असेल मात्र एवढी

2- मजबूत हायब्रीड प्रणालीसाठी इंजिन आणि इलेक्ट्रिक पावर ट्रेनचे एकत्रित आउटपुट 115 bps आहे आणि इंजिनचा टॉर्क आउटपुट 122 Nm असेल आणि इलेक्ट्रिक मोटार 141 Nm असेल

3- ब्रँड विटारा ही पॅनोरमिक सनरूफसह येणारे मारुती सुझुकी चे पहिले वाहन असेल. या कारमध्ये सहा एअर बॅग, टायर प्रेशर मॉनिटरिंग  सिस्टम आणि इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण यांचा समावेश आहे.

याशिवाय 360 डिग्री पार्किंग कॅमेरा, नऊ इंच इन्फोटेनमेंट सिस्टम आणि वायरलेस चार्जिंग हे ग्रँड  विटारा ची इतर वैशिष्ट्ये आहेत.

नक्की वाचा:Electric Cars News : 5 सेकंदात 100 किमीचा वेग! ही इलेक्ट्रिक कार धमाका करण्यासाठी सज्ज; सिंगल चार्ज मध्ये ४१८ किमी

4- वाहन ऑल व्हील ड्राईव्ह सिस्टम सोबत दिले जाईल. आतापर्यंत टोयोटा अर्बन क्रुझर आणि ग्रंड विटारा या विभागातील एकमेव मध्यम आकाराच्या एसयूव्ही आहेत, ज्यामध्ये ऑल व्हील ड्राईव्ह पावर ट्रेन आहे.

5- तसेच ऑलग्रीप ऑल व्हील ड्राईव्ह प्रणाली वापरले आहे आणि ती मल्टिपल ड्राईव्ह मोडसह येते.

वाळू, बर्फ आणि खडक हे ड्राईव्ह मोड आहेत. तसेच या कारला ऑटो मोड देखील देण्यात आला असून त्यामध्ये सिस्टम आपोआप भूभाग ओळखेल आणि आवश्यक बदल करील.

 या कारची किंमत

 ग्रँड विटारा ची सुरुवातीचे किंमत साडे नऊ लाख रुपये असू शकते. ही किंमत एक्स शोरूम असण्याची शक्यता आहे.

नक्की वाचा:Best CNG Cars: 'या' आहेत सर्वाधिक मायलेज देणाऱ्या स्वस्त सीएनजी कार; जाणून घ्या...

English Summary: maruti suzuki launch grand vitara suv with many attractive feature
Published on: 21 July 2022, 10:36 IST