Automobile

नवी मुंबई: मारुती सुझुकी ही भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील एक नामांकित कंपनी आहे. या कंपनीची वॅगनआर ही भारतीय बाजारपेठेतील एक लोकप्रिय आणि मध्यमवर्गीयांची सर्वात आवडती कार म्हणुन उदयास आली आहे. ही बजेट सेगमेंटमधील एक बेस्ट सेलिंग कार म्हणुन ओळखली जाते.

Updated on 21 May, 2022 11:17 PM IST

नवी मुंबई: मारुती सुझुकी ही भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील एक नामांकित कंपनी आहे. या कंपनीची वॅगनआर ही भारतीय बाजारपेठेतील एक लोकप्रिय आणि मध्यमवर्गीयांची सर्वात आवडती कार म्हणुन उदयास आली आहे. ही बजेट सेगमेंटमधील एक बेस्ट सेलिंग कार म्हणुन ओळखली जाते.

मारुती सुझुकी कंपनीने या कारमध्ये अनेक उत्कृष्ट फिचर्स दिले आहेत. शिवाय या कारमध्ये कंपनीने मजबूत इंजिन आणि आकर्षक कॉम्पॅक्ट लुक दिला आहे ज्यामुळे भारतीय लोकांची ही एक आवडती कार बनली आहे. कंपनीने ही कार एक्स-शोरूम 5 लाख 39 हजारांच्या सुरवातीच्या किंमतीत उतरवली आहे. मात्र असे असले तरी या कारच्या टॉप व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत ही जवळपास 7 लाख 10 हजारापर्यंत आहे.

मित्रांनो जर आपणास ही कार खरेदी करायची असेल मात्र यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध नसेल तर चिंता करू नका कारण आज आम्ही तुमच्यासाठी एका भन्नाट ऑफरची माहिती घेऊन हजर झालो आहोत. मित्रांनो जर आपणांस ही कार खरेदी करायची असेल तर आपण ही कार सेकंड हॅन्ड खरेदी करू शकतात. ही कार ऑनलाइन सेकंड हॅन्ड खरेदी आणि विक्री वेबसाइटवर अगदी कमी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. या वेबसाइट्स या कारवर अतिशय आकर्षक डील देत आहेत. चला तर मग जाणुन घेऊया याविषयी.

Royal Enfield: रॉयल एनफिल्ड इलेक्ट्रिक बुलेट लाँच करणार; वाचा याविषयी

CARWALE वेबसाइटवर असलेली भन्नाट ऑफर

मित्रांनो CARWALE या वेबसाइटवर मारुती सुझुकी वॅगनआर सेकंड हॅन्ड कार विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. या वेबसाईटवर 2008 मॉडेल मारुती सुझुकी वॅगनआर अत्यंत कमी किमतीत विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे. जर तुम्हालाही कार खरेदी करायची असेल तर आपण या वेबसाईटवर जाऊन ही कार कमी किमतीत खरेदी करू शकता. मित्रांनो या वेबसाईटवर ही कार 80,000 च्या किमतीत विक्रीसाठी सूचीबद्ध करण्यात आली आहे. मात्र असे असले तरी सध्या या कारवर कंपनीकडून कोणत्याही प्रकारची फायनान्स सुविधा दिली जात नाहीय.

Electric Car: एकदा चार्ज केली की 528 किलोमीटर धावते ही कार; जाणुन घ्या या कारची किंमत आणि फिचर्स

OLX वेबसाइटवर असलेली भन्नाट ऑफर

मित्रांनो सेकंड हॅन्ड खरेदी विक्री करणारी साईट ओएलएक्स वर मारुती सुझुकी वॅगनआर सेकंड हॅन्ड कार विक्री साठी सूचीबद्ध करण्यात आली आहे. या वेबसाईटवर मारुती सुझुकी वॅगनआर 2008 मॉडेल विक्रीसाठी नुकतीच उपलब्ध झाली आहे. OLX वेबसाइटवर ही सेकंड हॅन्ड कार अतिशय कमी किमतीत उपलब्ध झाल्याचे सांगितले जात आहे. ही कार या वेबसाईटवर मात्र 85,000 मध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे. मात्र असे असले तरी सध्या कंपनी या कारवर कोणत्याही प्रकारची फायनान्स सुविधा देत नाहीये.

Business Idea: बारामाही डिमांड मध्ये असलेला हा व्यवसाय बनवु शकतो कमी वेळेत श्रीमंत; वाचा सविस्तर

कारदेखो वेबसाइटवर असलेली भन्नाट ऑफर

मारुती सुझुकी वॅगनआर ही सेकंड हॅन्ड कार कार देखो वेबसाईटवर विक्रीसाठी सूचीबद्ध झाली आहे. या कारचे 2008 मॉडेल कारदेखो वेबसाइटवर अतिशय कमी किमतीत विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे. ही कार या वेबसाईटवर मात्र 75,000 च्या किंमतीत उपलब्ध झाली आहे. मात्र असे असले तरी, सध्या कंपनी या सेकंड हॅन्ड कारवर कोणत्याही प्रकारची फायनान्स सुविधा देत नाहीये.

English Summary: Maruti Suzuki: Buy Maruti Suzuki's WagonR car for one lakh; Learn about the 'Ya' Bhannat offer
Published on: 21 May 2022, 11:17 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)