Automobile

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी 30 जुलै पासून स्कॉर्पिओ-एनची बुकींग सुरू करणार आहे. एवढेच नाही तर सुरुवातीला फक्त पंचवीस हजार गाड्यांचे बुकिंग महिंद्रा घेणार आहे. म्हणजेच जो प्रथम येईल त्याला प्राधान्य या तत्त्वावर ही बुकिंग केली जाणार आहे.

Updated on 07 July, 2022 3:41 PM IST

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी 30 जुलै पासून स्कॉर्पिओ-एनची बुकींग सुरू करणार आहे. एवढेच नाही तर सुरुवातीला फक्त पंचवीस हजार गाड्यांचे बुकिंग महिंद्रा घेणार आहे. म्हणजेच जो प्रथम येईल त्याला प्राधान्य या तत्त्वावर ही बुकिंग केली जाणार आहे.

तसेच सणासुदीच्या दिवसांपासून या कारची डिलिव्हरी सुरु केली जाणार आहे. ज्या ग्राहकांना या गाडीची टेस्ट ड्राईव्ह द्यायचे आहे ते पाच जुलै पासून देशातील तीस शहरांमध्ये टेस्ट ड्राईव्ह येऊ शकतील. बाकीच्या शहरांमध्ये 15 जुलैपासून टेस्ट ड्राईव्ह मोहीम सुरू होईल.

 मॅन्युअल व्हेरिएंटची किंमत

 महिंद्रा स्कॉर्पिओ एन च्या पेट्रोल आणि डिझेल दोन्ही प्रकारच्या मॅन्युअल ट्रान्समिशन च्या किमती जाहीर केले असून जाहीर झालेल्या किमती सुरुवातीच्या 25000 बुकिंगसाठी असतील.

नक्की वाचा:19 हजारात खरेदी करा मारुती अल्टो 800, जाणून घ्या या ऑफरविषयी

याचा अर्थ कंपनी त्यांची किंमत नंतर वाढवू शकते स्कार्पिओ N, Z2 त्या सुरुवातीच्या पेट्रोल व्हेरिएंटची किंमत 11.99 लाख रुपये एक्स शोरूम आहे. 

पेट्रोल मधील टॉप व्हेरिएंट Z8L ची किंमत 18.99 लाख रुपये आहे.  हे सर्व टू व्हील ड्राइव प्रकार आहेत. महिंद्रा कंपनी एक जुलै रोजी पेट्रोलमध्ये फोर व्हील ड्राईव्ह अर्थात 4WD ची किंमत जाहीर करेल.

नक्की वाचा:कार-बाईक चालवणाऱ्यांची होणार दिवाळी! ितीन गडकरी यांची मोठी घोषणा

 शेतकऱ्यांसाठी महिंद्रा स्कॉर्पिओ-एन फायदेशीर

ही कार शेतकऱ्यांच्या फायद्याचे ठरणार आहे कारण हे कारण तुम्ही कोठेही चालवू शकतात.

या कारच्या फिचरमध्ये शेतकऱ्यांसाठी एक वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे नवीन महिंद्रा स्कार्पियो-एन मध्ये वाळू, माती, गवत आणि बर्फ सारख्या चार ड्रायव्हिंग मोड्स देण्यात आले आहेत.

त्यामुळे शेतकरी शेतीतून कार नेताना या मोड्सचा वापर करू शकतील. तसेच पर्यटकांसाठी देखील कार विशेष कार्य करेल ही कार बर्फामध्ये देखील उत्तम चालणार आहे.

 वाचा:Car News: शेतकऱ्यांच्या पसंतीच्या 'अल्टो' आता अवतरणार के-10 अवतारात, अल्टो कारचे नवे रूप

English Summary: mahindra scorpio n is useful to farmer because four important modes involve in this car
Published on: 07 July 2022, 03:41 IST