सध्या सणासुदीचे मुहूर्ताला अनेक वाहन निर्मिती कंपन्या त्यांच्या वाहनाची लॉन्चिंग करत असून ग्राहकांना परवडतील अशा किमतीमध्ये वाहने सादर केली जात आहे. यामध्ये अनेक चारचाकी वाहन निर्माण करणाऱ्या कंपन्या आणि दुचाकी निर्माण करणाऱ्या कंपन्यांचा समावेश आहे. जर आपण दुचाकींचा विचार केला तर यामध्ये अनेक स्टायलिश आणि स्पोर्टी बाईक सध्या लॉन्च करण्यात येत आहेत
याच पार्श्वभूमीवर सध्या किवेने भारतीय बाजारांमध्ये एक नवीन एसआर 125 बाईक लॉन्च केली आहे. या लेखामध्ये या बाइकचे वैशिष्ट्ये आपण जाणून घेऊ.
नक्की वाचा:Komaki ने भारतात लाँच केली हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या किती आहे किंमत
'किवे एसआर 125' बाईकची वैशिष्ट्ये
कंपनीने ही बाईक अतिशय सोप्या पद्धतीने डिझाईन केली असून टियर ड्रॉप शेपसह कॉम्पॅक्ट साईड पॅनल देण्यात आले आहेत. या बाईकला लहान हॅलोजन हेडलाईट, सिंगलपॉड कलर डिजिटल डिस्प्ले वरच्या जागेवर देण्यात आला
असून ही बाईक पांढऱ्या, लाल आणि काळ्या रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या बाईकचे वैशिष्ट्य म्हणजे या बाईक लुक यामाहा आरएक्स 100 सारखाच आहे. सिंगल पीस सिटला थोडासा कॉन्ट्रास्ट देऊन टॅन ब्राऊन रंग मिळतो.
नक्की वाचा:भारतात लवकरच लॉन्च होणार मोठ्या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या संपूर्ण माहिती
इतर महत्वाचे वैशिष्टे
या बाइकमध्ये सिंगल सिलेंडर, चार स्ट्रोक इंजन तसेच दोन वाल्व, SOHC आणि इयर कुल्ड इंजिन उपलब्ध असेल. बाईक 125cc डीरिप्लेसमेंट असलेली बाईक असून 9000 RPM पर्यंत 9.7HP आणि 7500 RPM पर्यंत 8.2Nm टॉर्क जनरेटर करेल.
बाइकचे वजन 120 किलो असून 14.5 लिटरची इंधन टाकी देण्यात आली आहे. पुढील आणि मागील ब्रेक एकाच डिस्कने बसवले असून या गाडीला कॉम्बो ब्रेकिंग सिस्टम सह 17 इंच स्पोक व्हील मिळतात.
तुम्हालाही बाईक खरेदी करायची असेल तर तुम्ही भारतात असलेल्या किवे शोरूममधून 1000 रुपयांच्या टोकन रकमेसह खरेदी करू शकतात.
किती आहे या बाईकची किंमत?
या बाईकची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत एक लाख 19 हजार रुपये आहे.
Published on: 15 October 2022, 08:20 IST