Automobile

कावासाकी कंपनीने या सणासुदीच्या मुहूर्तावर भारतीय बाजारपेठेत एक दमदार दुचाकी सादर केली असून कावासखीच्या कमी किमतीच्या बाईक पैकी ही ही एक आहे. कावासखीचा या बाईकचे नाव आहे 'कावासाकी डब्ल्यू 175' होय. सध्या या गाडीची बुकिंग सुरू झाली असून डिलिव्हरी डिसेंबर 2022 मध्ये होणार आहे. या लेखात आपण या बाईकचे वैशिष्ट्य जाणून घेऊ.

Updated on 28 September, 2022 4:03 PM IST
AddThis Website Tools

कावासाकी कंपनीने या सणासुदीच्या मुहूर्तावर भारतीय बाजारपेठेत एक दमदार दुचाकी सादर केली असून कावासखीच्या कमी किमतीच्या बाईक पैकी ही ही एक आहे. कावासखीचा या बाईकचे नाव आहे 'कावासाकी डब्ल्यू 175' होय. सध्या या गाडीची बुकिंग सुरू झाली असून डिलिव्हरी डिसेंबर 2022 मध्ये होणार आहे. या लेखात आपण या बाईकचे वैशिष्ट्य जाणून घेऊ.

नक्की वाचा:Bike News: भावांनो! या सणासुदीच्या काळात बाईक घ्यायची असेल तर 'या' बाईक्सवर मिळत आहे जबरदस्त सूट

या दमदार बाईकचे दमदार वैशिष्ट्ये

 या बाईकचे स्ट्रक्चर हे डब्ल्यू 800 दुचाकी सारखे असून यामध्ये गोल हेडलाईट, एअर ड्रॉप आकाराची इंधन टाकी आणि बॉक्सि साईड पॅनल हे कावासाकी डब्ल्यू 800 सारखे दिसतात. एवढेच नाही तर या बाईकच्या मागच्या बाजूस एक वक्र फेंडर आहे ज्यामध्ये टेल लाईट आणि निर्देशक आहेत.

या बाईकचे अर्गोनॉमिक्स सरळ स्थितीत असल्यामुळे कमरेला आरामदायक स्थिती देईल व त्यासोबत 790 मीमी, सिंगल पीस सीट दुरच्या अंतरासाठी आरामदायक आहे.या बाईक मध्ये इन्स्ट्रुमेंटेशनला डिजिटल रेट्रो स्टाइल स्पीडोमीटर देण्यात आले

असून त्यामध्ये ओडोमीटर,ट्रिपल मीटर आणि इंडीकेटर लाईट देखील उपलब्ध आहेत. एवढेच नाही तर यामध्ये न्यूट्रल,  हाय बिम, टर्न इंडिकेटर आणि काही वार्निंग लाईटची वैशिष्ट्ये आहेत. या बाईकला पुढील आणि मागील साईडला 17 इंच स्पोक्ड व्हील मिळतात. ट्रेड पॅटर्नचे टायर बाईकला रस्त्यावर चांगली ग्रिप ठेवण्यास मदत करतात.

नक्की वाचा:Bike update:सणासुदीच्या दिवसात बाईक घ्यायची?तर 'या'आहेत कमी किमतीत मिळणाऱ्या दमदार बाईक्स, वाचा डिटेल्स

तसेच यामध्ये समोरच्या बाजूला डिस्क ब्रेकसह सिंगल चॅनेल एबीएस मिळते ज्यामुळे त्याला विशेष थांबण्याची शक्ती मिळते.

या बाईकच्या सस्पेन्शन बद्दल बोलायचे झाले तर तिला समोरील बाजूस टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि मागील बाजूस समायोजित करणे योग्य ट्विन शॉक शोषक आहेत.

सोबतच मागील ससपेन्शन ट्रॅव्हल 65 मीमी आहे. या बाईकचे 177 सीसी सिंगल सिलेंडर एयर कूल्ड, चार स्ट्रोक इंजिन द्वारे समर्थीत आहे.  या बाइकचे वजन एकशे पस्तीस किलो असून इंधन टाकीची क्षमता 12 लिटर आहे. या बाईकची सिटची उंची 790 मीमी आहे.

 या बाईकची किंमत

 यामधील स्टॅंडर्ड व्हेरिएंटची किंमत एक लाख 47 हजार रुपये असून स्पेशल एडिशनची किंमत एक लाख 49 हजार रुपये( एक्स शोरूम)आहे.हे बाईक दोन रंगांमध्ये म्हणजेच इबोनी आणि कँडी पर्सीमोन रेडसह दोन रंगांमध्ये येते.

नक्की वाचा:Electric Bikes In India : काय म्हणालात…! 'या' इलेक्ट्रिक बाईक एका चार्जवर धावतात तब्बल 200 किलोमीटर, किंमत देखील आहे मात्र 'एवढी'

English Summary: kawasaki launch kawasaki w 175 bike with so many attractive feature
Published on: 28 September 2022, 04:03 IST