भारतीय वाहन बाजारात एसयूव्ही, कॉम्पॅक्ट एसयूव्हींना मागणी वाढली असून भारतात सध्या मोठ्या प्रमाणात या प्रकारच्या गाड्यांची विक्री होत आहे. गेल्या महिनाभरात भारतात या सेगमेंटमध्ये चार गाड्या लाँच झाल्या आहेत. या महिन्यात देखील या सेगमेंटमध्ये तीन नव्या कार दाखल होणार आहेत. मारुती सुझुकी, ह्युंदाय मोटर इंडिया आणि सिट्रॉनसारख्या कंपन्या या महिन्यात आपल्या छोट्या एसयूव्ही लाँच करणार आहेत.
नवीन ऑडी ए8 एल सेडान १२ जुलै रोजी भारतीय बाजारात दाखल होईल. न्यू जनरेशन ह्युंदाई टक्सन १३ जुलैला, तर महिंद्राच्या स्कॉर्पिओ एन या एसयूव्हीचं ऑटोमॅटिक व्हेरिएंट २१ जुलै रोजी लाँच केलं जाणार आहे. २० जुलै रोजी दोन मोठ्या कार लाँच होणार आहेत, ज्यामध्ये मारुती सुझुकीची मिड साईज एसयूव्ही आणि Citroen C3 प्रीमियम हॅचबॅक कारचा समावेश आहे. तसेच मारुतीची विटारा आणि ह्युंदाईची नवीन क्रेटा देखील बाजारात दाखल होणार आहे.
हेही वाचा : भन्नाट ऑफर! Alto च्या किंमतीत मिळणार टाटाची ही दमदार कार जाणून घ्या डिटेल्स
Maruti Vitara SUV
मारुती सुझुकी गेल्या काही वर्षांपासून भारतीय बाजारात विटारा ब्रेझा नावाची कॉम्पॅक्ट एसयूव्ही विकल्या जात आहे. मात्र कंपनीने गेल्या महिन्यात मारुती ब्रेझा नावाची नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही लाँच केली. कंपनी आता या महिन्यात मारुती विटारा या नावाची नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही लाँच करणार आहेत.
फीचर्स
या एसयूव्हीमध्ये 1.5L K15C DualJet पेट्रोल युनिट तसेच Toyota चं 1.5L TNGA पेट्रोल युनिट मिळेल. हे इंजिन माईल्ड हायब्रिड टेक्नोलॉजीसह सुसज्ज असेल. तसेच यात ६ स्पीड मॅन्युअल आणि ६ स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स दिला जाईल. या एसयूव्हीचे मॅन्युअल व्हेरियंट ऑल व्हील ड्राइव्ह सिस्टमसह लाँच केलं जाऊ शकतात. या कारची किंमत १० लाख रुपयांपेक्षा जास्त असेल. ही कार मारुती ब्रेझापेक्षा थोडी मोठी आणि अधिक फीचर्ससह सुसज्ज असेल.
Citroen C3
सायट्रोएन ही कंपनी गेल्या दोन वर्षांपासून भारतीय बाजारात आपलं स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनीच्या दोन गाड्या भारतात विकल्या जातात. मात्र या वाहनांना अद्याप म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. आता कंपनी भारतात सर्वाधिक मागणी असलेल्या सेगमेंटमध्ये म्हणजेच एंट्री लेव्हल सेगमेंटमध्ये आपली कार लाँच करणार आहे.
कंपनी २० जुलै रोजी नवीन सिट्रॉन सी ३ ही प्रीमियम हॅचबॅक कार लाँच करणार आहे. यामध्ये दोन इंजिनांचे पर्याय मिळतील. ज्यामध्ये पहिलं लाईव्ह हे १.२ लीटर नॅचरली अॅस्पिरेटेड पेट्रोल (115Nm टॉर्क आणि 82PS पॉवर) इंजिन दिलं जाईल. तर दुसरं जे १.२ लीटर टर्बो पेट्रोल (1990Nm टॉर्क आणि 110PS पॉवर) इंजिन दिलं जाईल. ही कार टर्बो पेट्रोल इंजिनसह १९.४ किमी प्रति लीटर इतकं मायलेज देईल. तसेच नॅचरली अॅस्पिरेटेड पेट्रोल इंजिनसह १९.८ किमी प्रति लीटर इतकं मायलेज देईल.
Published on: 08 July 2022, 02:25 IST