Automobile

ह्युंदाई ही कार निर्मिती क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी असून या कंपनीने काल म्हणजेच मंगळवारी वेन्यू एन लाईन कार लॉन्च केली. यामध्ये महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही कार ग्राहकांना 21 हजारात बुकिंग करता येणार असून ही कार मोटर स्पोर्ट्स मेकॅनिझमसह डिझाईन केलेली असल्यामुळे थरारक शैलीतील कार ग्राहकांना डायनामिक आणि स्पोर्टिंग ड्रायव्हिंगचा अनुभव दिल्याशिवाय राहणार नाही.

Updated on 07 September, 2022 7:01 PM IST

 ह्युंदाई ही कार निर्मिती क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी असून या कंपनीने काल म्हणजेच मंगळवारी वेन्यू एन लाईन कार लॉन्च केली. यामध्ये महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही कार ग्राहकांना 21 हजारात बुकिंग करता येणार असून ही कार मोटर स्पोर्ट्स मेकॅनिझमसह डिझाईन केलेली असल्यामुळे थरारक शैलीतील कार ग्राहकांना डायनामिक आणि स्पोर्टिंग ड्रायव्हिंगचा अनुभव दिल्याशिवाय राहणार नाही.

सस्पेन्शन आणि स्टेरिंग मध्ये बदल करण्यात आला असून मजेदार ड्रायव्हिंग अनुभव त्याद्वारे ग्राहकांना घेता येणार आहे. कंपनीने या कारचे बुकिंग 25 ऑगस्ट पासून सुरू केली असून ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून व शोरूम मधून ही कार बुकिंग करू शकतात.

नक्की वाचा:Tata Motors: टाटा मोटर्स सीएनजी कारसह अनेक गाड्यांवर देत आहे बंपर सूट; जाणून घ्या सविस्तर

 या कारची वैशिष्ट्ये

या कारमध्ये तीन ड्रायविंग मोड देण्यात आली असून यामध्ये नॉर्मल,इको आणि स्पोर्ट असे तीन मोड आहेत. पेडल शिफ्टरसह सात स्पीड डीसीटी, चार डीस्क ब्रेक आणि हुंडाईच्या साठ ब्लूलिंक कनेक्टेड कार वैशिष्ट्यांमुळे ही कार ग्राहकांना स्मार्ट मोबिलिटीचा अनुभव देणारी ठरणार आहे. होम टू कार स्मार्ट फिचर, अलेक्सा आणि गुगल व्हाईस असिस्टंटसारखे वैशिष्ट्ये देखील या कारमध्ये समर्थ असणार आहेत.

या कारमध्ये तुम्ही नॉर्मल, इको आणि स्पोर्ट या ड्रायविंगमोड मधील वेगवेगळ्या ड्रायव्हिंग अनुभव घेऊ शकणार असून हे अनुभव निवडण्यास सक्षम असणार आहे.

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 20 पेक्षा जास्त मानक सुरक्षा वैशिष्ट्य यामध्ये आहे.1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजन या कारमध्ये उपलब्ध असणार आहे. या कारच्या केबिनमध्ये पुढील भागावर इन लाईन लोगो असणार असून मागील बंपर आणि खालच्या भागावर लाल उच्चारण बॅजिंग वर आहे.

नक्की वाचा:टाटा कंपनीचे नवीन फीचर्स घेऊन बाजारात ट्रक लाँच, टाटा ने भारतात रचला इतिहास

लाल फ्रंट कॅलिपर आणि 16 इंच अल्लोय व्हील डिझाईन राहील. एवढेच नाही तर केबिनमध्ये तीन स्पोक स्टेरिंग व्हील उपलब्ध असणार आहे.

अँड्रॉइड ऑटो, कंनेक्टेड कार टेक, पावर ड्रायव्हर सीट,इंटिग्रेटेड एअर पुरिफायर, व्हॉईस कमांड,  डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि बॉस साऊंडसह एकाअधिक रेकॉर्डिंग पर्यायांसह 8 इंच टचस्क्रीन सिस्टम डॅश कॅमेरा यामध्ये उपलब्ध आहे.

ही कार फँटम ब्लॅक रूफसह थंडर ब्लू, ध्रुवीय पांढरा, फँटम ब्लॅक रूफसह ध्रुवीय पांढरा, सावली राखाडी आणि फॅटम ब्लॅक रूफसह शाडो ग्रे अशा पाच रंगांमध्ये ही कार आहे.

 कारची किंमत

 या कारची किंमत बारा लाख 16 हजार रुपये असून ग्राहकांना 21000 हजारात बुकिंग करता येणार आहे.

नक्की वाचा:Car Update: पाच ते दहा लाखाच्या आत मिळतात 'या' 7 सीटर कार,वाचा या कारची

English Summary: hundai launch venue line in car at tuesday can booking in 21 thousand rupees
Published on: 07 September 2022, 07:01 IST