Automobile

Honda Activa : मित्रांनो जसं की तुम्ही बघत आहात या वर्षाच्या सुरुवातीपासूनच वाहनांच्या किमती आकाशाला गवसणी घालू पाहत आहेत. देशातील सर्वच नामांकित कंपन्या त्यांच्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या किमती एकामागून एक वाढवत आहेत. ही महागाई पाहता आता काही लोक सेकंड हँड वाहनांकडे वळू लागले आहेत. आता प्रत्येकजण आपल्या बजेट मध्ये फिट होतील अशा किमतीत उत्तम बाइक शोधत आहेत. जर तुम्ही देखील तुमच्या बजेटमध्ये फिट होणारी बाईक शोधत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.

Updated on 21 June, 2022 6:03 PM IST

Honda Activa 5G: मित्रांनो जसं की तुम्ही बघत आहात या वर्षाच्या सुरुवातीपासूनच वाहनांच्या किमती आकाशाला गवसणी घालू पाहत आहेत. देशातील सर्वच नामांकित कंपन्या त्यांच्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या किमती एकामागून एक वाढवत आहेत. ही महागाई पाहता आता काही लोक सेकंड हँड वाहनांकडे वळू लागले आहेत. आता प्रत्येकजण आपल्या बजेट मध्ये फिट होतील अशा किमतीत उत्तम  बाईक शोधत आहेत. जर तुम्ही देखील तुमच्या बजेटमध्ये फिट होणारी बाईक शोधत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.

मित्रांनो खरं पाहता, आज तुमच्यासाठी एक अतिशय सुवर्ण संधी चालून आली आहे, आता तुम्ही Honda Activa 5G फक्त 9,800 रुपयामध्ये खरेदी करू शकणार आहात. जसं की आपणांस ठाऊकच आहे Honda Activa ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी स्कूटी आहे. Honda Activa मध्यमवर्गीय लोकांची पहिली पसंत बनू पाहात आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात होंडा कंपनीने आपला दारोमदार कायम राखला असून कंपनीची ही एक सर्वात बेस्ट स्कूटर म्हणून ओळखले जाते.

त्याच वेळी होंडा ऍक्टिवा स्कूटर आपल्या चांगली कामगिरी आणि वैशिष्ट्यांमुळे टू व्हीलर सेगमेंटमध्ये आपली एक वेगळी छाप सोडत आहे. मित्रांनो ही स्कूटर नव्याने खरेदी करण्यासाठी सुमारे एक लाख रुपये मोजावे लागतात. मात्र जर आपल्याकडे एवढा पैसा उपलब्ध नसेल तर आपण होंडा ॲक्टीव्हा सेकंड हॅन्ड खरेदी करू शकता. होंडा एक्टिवा सेकंड हँड स्कूटी फक्त 9 हजार 800 रुपयेला विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे. ही सेकंड हँड स्कूटर मात्र 7,350 किलोमीटर चालवली गेली आहे जी चांगल्या स्थितीत आहे आणि पहिल्या मालकाद्वारे विकली जात आहे.

Honda Activa कशी खरेदी करायची ते जाणुन घ्या:

आजकाल अनेक वेबसाइट्सवर सेकंड हँड बाइक्स आणि कार कमी किमतीत विकल्या जात आहेत. येथे तुम्हाला अनेक पर्याय मिळतील, तुम्ही ही Honda Activa 5G स्कूटर carandbike.com अशाच एका वेबसाइटवरून खरेदी करू शकता. ही स्कूटर अलीकडे विक्रीसाठी सूचीबद्ध केले गेले आहे.

ही स्कूटर तिच्या मालकाने जानेवारी 2021 मध्ये खरेदी केली होती, जी आतापर्यंत फक्त 7500 किलोमीटर चालवली गेली आहे. वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ती केवळ एका मालकाद्वारे चालवली जात आहे म्हणजेचं ही स्कूटर फर्स्ट ओनर आहे. कंपनीने दावा केला आहे की Honda Activa 68 Kmpl मायलेज देते आणि या साइटवर या उत्कृष्ट स्कूटरची किंमत ₹ 9800 ठेवण्यात आली आहे.

Honda Activa सारख्या अनेक बाईक्स आहेत:

इंटरनेटवर कार आणि बाइक डॉट कॉम सारख्या अनेक वेबसाइट्स उपलब्ध आहेत ज्या कमी किमतीत सेकंड हँड किंवा वापरलेल्या बाइक्स आणि स्कूटर विकतात. तुम्हाला कुठूनही सेकंड हँड बाईक खरेदी करायची असल्यास, तुम्ही ती वेबसाइट उघडू शकता आणि वापरलेल्या बाइकच्या विभागात शोधू शकता. येथे जाऊन तुम्हाला तुमच्या आवडत्या कंपनीचे नाव, मॉडेल आणि किंमत टाकावी लागेल. यानंतर तुमच्यासमोर अनेक पर्याय खुले होतील. तुम्ही त्या पर्यायावर क्लिक करून तपशील मिळवू शकता आणि तुम्हाला आवडत असल्यास, तुम्ही ते खरेदी देखील करू शकता.

English Summary: Honda activa purchased at 10 thousand
Published on: 21 June 2022, 06:03 IST