Hero MotoCorp 7 ऑक्टोबर 2022 रोजी त्यांची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्यासाठी तयार झालेली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार कंपनीने आधीच आपल्या डीलर्स, गुंतवणूकदार आणि जागतिक वितरकांना लॉन्चसाठी आमंत्रण सुद्धा पाठवले आहे. राजस्थान राज्याची राजधानी जयपूर येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. नवीन Hero इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीच्या नवीन विडा सब-ब्रँड अंतर्गत येईल, जी विशेषतः विद्यमान उदयोन्मुख मोबिलिटी सोल्यूशन्ससाठी डिझाइन केलेली आहे. मॉडेलच्या किंमती येईल या पुढच्या आठवड्यामध्ये सांगितल्या जातार आहेत. परंतु त्याची किंमत सुमारे 1 लाख रुपये असणार आहे जे की मोठ्या प्रमाणावर बुकिंग सुद्धा होणार आहे.
Hero ने केली हातमिळवणी :-
नवीन विडा उप-ब्रँड 1 जुलै 2022 रोजी सादर करण्यात आला. जे की येणारी Hero इलेक्ट्रिक स्कूटरची जे फीचर्स आहेत ते सध्या उघडकीस आलेले नाहीत. मात्र सध्या Hero MotoCorp ने देशात ईव्ही आणि बॅटरी स्वॅपिंग नेटवर्क करण्यासाठी तैवान-आधारित फर्म गोगोरो सोबत आपली हातमिळवणी केलेली आहे. गोगोरो सध्या त्याच्या 2,000 बॅटरी स्वॅपिंग पॉइंट्सद्वारे 3,75,000 रायडर्सना सेवा देत आहे.
हेही वाचा:-राज्यात दिवाळी आणि दसऱ्यामुळे बेदाण्याच्या दरात सुधारणा, बाजारात सुद्धा प्रचंड मागणी.
मार्च २०२२ ला होणार होती लाँच :-
एकदा भारतीय बाजारपेठेत लॉन्च झाल्यानंतर, Hero ची इलेक्ट्रिक स्कूटर TVS iQube, बजाज चेतक आणि त्याच्या अनेक स्पर्धेत असणाऱ्या स्कुटर ला टक्कर देणार आहे. यापूर्वी, ही इलेक्ट्रिक स्कूटर मार्च 2022 मध्ये लॉन्च होणार होती परंतु पुरवठ्याची कमतरता आज अनेक काही अडचणीमुळे जास्त उशीर झाला. ही स्कुटर जयपूर च्या R&D हब सेंटर मध्ये विकसित केली आहे तर आंध्रप्रदेश मधील प्लांट मध्ये तयार केली जाणार आहे.
हेही वाचा:-भूमिहीन शेतकऱ्याने नाममात्र करारावर शेती करून साधली प्रगती, वाचा सविस्तर
सध्या देशात Hero च्या काही चाचण्या सुरू :-
देशांतर्गत दुचाकी निर्माता कंपनी दोन नवीन 300cc बाइक्सची चाचणी करत आहे - Xtreme 300 आणि XPluse 300. Hero Xtreme 300 ही पूर्णपणे फेअर बाईक असणार आहे तर XPluse 300 ही नवीन ऍडव्हेंचर मोटरसायकल असणार आहे. ज्यावेळी चाचणी चालू होते त्या दरम्यान मॉडेल्समध्ये पेटल डिस्क तसेच रेड ट्रेलीस फ्रेम, क्लच कव्हर, क्रोम फिनिश साइड स्टँड आणि स्विंगआर्मसह फ्रंट स्पोक व्हील दिसले आहेत.
Published on: 22 September 2022, 04:51 IST