Automobile

नवी मुंबई: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती रोजाना आकाशाला गवसणी घालत आहेत. यामुळे देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलचे दर देखील भडकले असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसत असून त्यांचे बजेट कोलमडले आहे. भारतातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी पार केली आहे.

Updated on 28 May, 2022 4:06 PM IST

नवी मुंबई: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती रोजाना आकाशाला गवसणी घालत आहेत. यामुळे देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलचे दर देखील भडकले असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसत असून त्यांचे बजेट कोलमडले आहे. भारतातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी पार केली आहे.

नाशिक जिल्ह्यातील मालेगावात पेट्रोल 111 रुपये प्लस झाले आहे. तर डिझेलचा दरही जवळपास शंभरीच्या आसपास बघायला मिळत आहे. देशभरातील वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईच्या पार्श्वभूमीवर आता ऑटोमोबाईल कंपन्यांनीही इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन वाढवले ​​आहे. आता देशात इंधन दरवाढीच्या पार्श्‍वभूमीवर इलेक्ट्रिक वाहनांची खपत वाढली आहे. सर्वसामान्य लोक देखील आता मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देत आहेत.

इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीमुळे सर्वसामान्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींपासून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. यामुळे जर तुम्हाला देखील इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायची असेल तर आजची ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. अलीकडेच देशातील अग्रगण्य दुचाकी निर्माती कंपनी Hero ने Hero Eddy नावाची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे, ज्याला बाजारात लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

जर तुम्हालाही ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची असेल, तर तुम्ही एकरकमी पैसे देण्याऐवजी Hero Eddy ही इलेक्ट्रिक स्कूटर फायनान्स करून आपली बनवु शकता. केवळ 5,000 रुपयांच्या डाऊनपेमेंटवरही आपण ही स्कूटर घरी घेऊन जाऊ शकता. यानंतर तुम्हाला 2 वर्षे किंवा 3 वर्षांसाठी कर्ज मिळेल आणि त्यानंतर तुम्ही हप्ते म्हणून दरमहा अगदी नाममात्र रक्कम जमा करून स्कूटर चे उर्वरित पैसे फेडू शकता.

Best Mileage Bikes: एका लिटर पेट्रोलमध्ये 90 किलोमीटर धावणाऱ्या 'या' चार गाड्या आहेत दमदार; फिचर्स आहेत भन्नाट

इलेक्ट्रिक स्कूटरचे फिचर्स जाणून घ्या

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की जर आपण Hero इलेक्ट्रिक कंपनीच्या या स्कूटरच्या किंमती आणि वैशिष्ट्यांबद्दल बोललो तर Hero Eddy ची किंमत 72,000 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. ही स्कूटर एका चार्जवर 85 किमी पर्यंत धावत असल्याचा कंपनीचा दावा आहे आणि 25 किमी प्रतितास पर्यंतचा या स्कूटरला वेग आहे.

स्कूटरमध्ये 250 वॅटची BLDC मोटर आहे. तुम्ही ते 4-5 तासात घरीच पूर्णपणे चार्ज करू शकता. Hero Electric ची ही कमी गतीची स्कूटर Ampere Reo Plus, BGauss A2 आणि Detel Easy Plus सारख्या स्कूटरशी स्पर्धा करते. आता आपण Hero Eddy च्या फायनान्स प्लॅन बद्दल जाणुन घेऊया.

Royal Enfield Bullet: 23 हजारात खरेदी करा 'ही' रॉयल एनफिल्डची भन्नाट बाईक; जाणुन घ्या ही ऑफर

5 हजार रुपयांत बना स्कूटरचे मालक

मित्रांनो तुम्हाला जर ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची असेल तर तुम्ही फक्त 5 हजार डाऊनपेमेंट करून ही इलेक्ट्रिक स्कूटर घरी घेऊन जाऊ शकता. त्याची किंमत 72 हजार रुपये आहे. 5000 रुपयांचे डाउनपेमेंट केल्यानंतर, तुम्हाला 8% व्याजदराने 2 वर्षांसाठी 67,000 रुपयांचे कर्ज मिळेल. यानंतर, तुम्हाला पुढील 24 महिन्यांसाठी सुमारे 3,030 रुपये EMI म्हणून भरावे लागतील.

English Summary: Hero Electric Scooter: Take home Hero's 'Hee' powerful electric scooter for Rs 5,000; Learn how
Published on: 28 May 2022, 04:06 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)