Automobile

नवी मुंबई : महिंद्रा (Mahindra) ही भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील एक नामांकित कंपनी आहे. या कंपनीची KUV 100 NXT ही एक दमदार आणि लोकांच्या पसंतीस खरी उतरलेली एक भन्नाट कार आहे. ही एसयूव्ही सेगमेंटमध्ये (Mahindra SUV Car) उपलब्ध कंपनीची एक उत्तम मायक्रो एसयूव्ही असल्याचा कंपनीचा दावा आहे.

Updated on 26 May, 2022 9:15 PM IST

नवी मुंबई : महिंद्रा (Mahindra) ही भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील एक नामांकित कंपनी आहे. या कंपनीची KUV 100 NXT ही एक दमदार आणि लोकांच्या पसंतीस खरी उतरलेली एक भन्नाट कार आहे. ही एसयूव्ही सेगमेंटमध्ये (Mahindra SUV Car) उपलब्ध कंपनीची एक उत्तम मायक्रो एसयूव्ही असल्याचा कंपनीचा दावा आहे. 

या मायक्रो एसयूव्ही असलेल्या कारमध्ये तुम्हाला आकर्षक डिझाइनसह अनेक आधुनिक फिचर्स देखील पाहायला मिळतात. यामुळे कंपनीची ही एक एक बेस्ट सेलिंग कार म्हणून उदयास येत आहे. कंपनीने बजेट सेगमेंटच्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन ही एसयूव्ही डिझाइन केली असल्याचे जाणकार लोकांचे मत आहे.

महिंद्रा कंपनीने या SUV च्या G80 K2 बेस व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत 6 लाख 17 हजार 834 रुपये एवढी एक्स शोरूम किंमत ठेवली आहे. ही कार जवळपास 6 लाख 95 हजार 995 रुपये पर्यंत ऑन रोड प्राईस मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे कंपनी या मायक्रो SUV कार खरेदीवर ग्राहकांना चांगली फायनान्स सुविधा देखील उपलब्ध करून देत आहे. यामुळे जर तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल तर आपण या उपलब्ध ऑफरचा जरूर फायदा घेऊ शकता आणि अगदी सुलभ हफ्त्यात ही भन्नाट कार आपली बनवु शकता.

महिंद्रा KUV 100 NXT च्या G80 K2 बेस व्हेरिएंटवर उपलब्ध फायनान्स प्लॅन 

Mahindra KUV 100 NXT च्या G80 K2 बेस व्हेरियंट कार खरेदीवर तुम्हाला कंपनीच्या संलग्न बँकेद्वारे जवळपास 6 लाख 25 हजार 995 रुपयेचे कर्ज मिळते. यासाठी तुम्हाला कंपनीला किमान 70 हजार रुपये डाउन पेमेंट करावे लागणार आहे.

यानंतर बँकेला 13,239 चा मासिक EMI भरून कर्जाची परतफेड केली जाऊ शकते. कंपनी Mahindra KUV 100 NXT च्या G80 K2 बेस व्हेरिएंटवर 5 वर्षांचे कर्ज देते आणि या कर्जावर तुम्हाला वार्षिक 9.8 टक्के व्याज आकारले जाते.

Mahindra KUV 100 NXT G80 K2 बेस व्हेरियंटचे स्पेसिफिकेशन 

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, कंपनी Mahindra KUV 100 NXT च्या G80 K2 बेस व्हेरिएंटमध्ये 1198 cc तीन-सिलेंडर पेट्रोल इंजिन देत आहे. हे इंजिन 82 bhp कमाल पॉवर आणि 115 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असल्याचा कंपनीचा दावा आहे. या इंजिनसह तुम्हाला मॅन्युअल ट्रान्समिशन मिळते.

मायलेजबद्दल बोलायचे झाले तर ही SUV कार 18.15 kmpl चा मायलेज देण्यास सक्षम असल्याचे सांगितले जाते विशेष म्हणजे हे मायलेज ARAI ने प्रमाणित केला असल्याचा कंपनीचा दावा आहे. Mahindra KUV 100 NXT G80 K2 बेस व्हेरियंटमध्ये ब्लूटूथ आणि AUX कनेक्टिव्हिटीसह 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, स्टीयरिंग माउंटेड ऑडिओ आणि कॉलिंग कंट्रोल्स, हाय-अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, फ्रंट सीटवर ड्युअल एअरबॅग्ज, ब्रेकिंग सिस्टम सारखी अँटी-लॉक वैशिष्ट्ये, EBD आणि रियर पार्किंग सेन्सर कंपनीने दिले आहेत.

निश्चितच ही कार बजेट सेगमेंटमध्ये भन्नाट फिचर्स असलेली एक दमदार SUV कार म्हणुन प्रचलित झाली आहे. शिवाय या कारमध्ये असलेले फीचर्स आणि मायलेज या कारला लोकांच्या पसंतीस खरे उतरवीत आहेत.

English Summary: Good News: Buy Mahindra's 'this' abandoned car for only Rs 70,000; Learn about this awesome offer
Published on: 26 May 2022, 09:15 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)