Automobile

मारुती सुझुकी कार निर्मिती क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण कंपनी असून या या कंपनीचे कार वेगवेगळे व्हेरिएंट बाजारपेठेत आहे. जर आपण सर्वसामान्यपणे विचार केला तर बऱ्याच व्यक्तींची मारुतीच्या कार्स मध्ये आवड असते. या सर्व आवड असणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी असून सध्या मारुती सुझुकी फेस्टीवल ऑफर्स मध्ये सहभाग घेत काही गाड्यांवर चांगल्या पद्धतीचा डिस्काउंट देत आहे. मारुती सुझुकी कोणत्या कारवार किती डिस्काउंट देत आहे याबद्दल माहिती घेऊ.

Updated on 01 October, 2022 4:00 PM IST

नक्की वाचा:Car News: मारुतीची पहिलीच हायब्रीड इंजिनवाली कार लॉन्च, वाचा मायलेज आणि किंमत

 मारुती सुझुकी देत आहे या गाड्यांवर चांगली सूट

1- मारुती वॅगनार- मारुती सुझुकी या कारची विक्री वाढवण्यासाठी मोठी सवलत देत असून जवळजवळ या कारवर 40 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे.

2-सेलेरिओ- मारुती सेलेरिओ या कारवर जवळजवळ 59 हजार रुपयांचा डिस्काउंट देत असून यावर कॅश डिस्काउंट, कार्पोरेट डिस्काउंट आणि एक्सचेंज बोनस ऑफर देखील उपलब्ध आहेत.

नक्की वाचा:Car News: खुशखबर! देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार टाटाने केली लाँच,वाचा या कारची वैशिष्ट्य आणि किंमत

3- मारुती एसप्रेसो- मारुतीच्या या कारवर देखील 59 हजार रुपयांची सूट देण्यात येत आहे.

4- मारुती अल्टो k10- ही देशातील सर्व स्वस्त कार पैकी एक असून महिन्याभरापूर्वी लॉन्च करण्यात आली आहे. मारुती सध्या

या कारवर 25 हजार रुपयांचा डिस्काउंट देत असून कारची एक्स शोरूम किंमततीन लाख 99 हजार रुपयांपासून सुरू होते.

5- मारुती अल्टो 800- मारुती या कारवर 29 हजारांचा डिस्काउंट देत असून यामध्ये एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंट उपलब्ध आहे.

नक्की वाचा:Car News: लवकरच येणार 'रेनॉल्ट'ची 'ही' इलेक्ट्रिक कार, वाचा या कारची जबरदस्त वैशिष्ट्ये

English Summary: get so attractive discount offer on maruti suzuki car verient
Published on: 01 October 2022, 04:00 IST