सर्वसामान्यांच्या आर्थिक आवाक्यातली मारुती कंपनीची अल्टो चे मॉडेल बंद करण्याचा निर्णय घेतला असून त्यातील एंट्री लेव्हल टू हॅचबॅक मधून तीन प्रकार वगळल्या आहेत. आता अल्टो मध्ये सीएनजी मॉडेल मध्ये एकच पर्याय उपलब्ध असणार आहे.
तो म्हणजे मारुती आता के 10 मॉडेल परत आणणार असून हे मॉडेल 2020 आली बीएस-6 मांनाकनामुळे बंद करण्यात आले होते.
सध्या मारुती कंपनीने अल्टो चे स्टॅंडर्ड, LXi आणि LXi सीएनजी मॉडेल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता हे मानक(O), LXi(O) CNG, VXI आणि VXI प्लस या नवीन प्रकारात उपलब्ध असणार आहे. आणि सीएनजी मॉडेल मध्ये फक्त एकच पर्याय उपलब्ध असणार आहे.
800cc पेट्रोल इंजिन
मारुती सुझुकी अल्टो ला 800cc चे पेट्रोल इंजिन देण्यात आले असून जे 47 बी एचपी पावर आणि 69 एन एम चा पिक टॉर्क जनरेट करते.
त्याचवेळी कंपनीचे सीएनजी मॉडेल 40 बिएचपी पॉवर आणि 60 एन एम टॉर्क जनरेट करते. या मॉडेलमध्ये 5 स्पीड गिअर बॉक्स असणार आहेत.
नक्की वाचा:या' कारने लावले वेड, लॉंच झाल्यापासून हजारोंचे बुकिंग, काय आहेत वैशिष्ट्ये, वाचा...
नवीन अल्टो ची वैशिष्ट्ये
या नवीन अल्टो कार मध्ये अनेक वैशिष्ट्ये ग्राहकांना मिळणार असून यामध्ये सात इंची टच स्क्रीन, इन्फोटेनमेन्ट सिस्टम, डुएल टोन इंटिरियर, सेंट्रल लॉकिंग, कीलेस इंट्री, फ्रंट आणि रियर कप होल्डर्स, रिव्हर्स पार्किंग सेंसर आणि समोरच्या बाजूला दोन्ही पासून एअरबॅग असणार आहे.
किती असेल या कारची किंमत
यामध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे जर कारच्या किमती बद्दल विचार केला सदर कंपनीने बेस्ट व्हेरिअन्ट बंद केल्यानंतर अल्टो ची सुरुवाती ची किंमत तीन लाख 39 हजार रुपये ( एक्स शोरूम ) झाली असून सीएनजी साठी ग्राहकास पाच लाख तीन हजार रुपये मोजावे लागणार आहेत.
नक्की वाचा:Maruti Suzuki Alto: टू व्हीलरच्या किंमतीत खरेदी करा मारुती सुझुकी अल्टो, ऑफर जाणून घ्या
लवकरच येणार अल्टो के-10
माध्यमांच्या अहवालावरून मारुती आपल्या नवीन के 10 कार ची तयारी करत आहे. Bs6 मानाकणावर आधारित अत्याधुनिक इंजिन सोबत ती पूर्णपणे नवीन प्रकारात आणली जाणार आहे. हे कंपनीचे मॉडेल अल्टो च्या नेक्स्ट जनरेशन वर आधारित असेल.
नक्की वाचा:भारीच! आता तुमची Activa इलेक्ट्रिक करा, एका वेळेस १०० किमी चालणार...
Published on: 07 July 2022, 10:00 IST