Automobile

हवेत उडणारा माणूस, कार किंवा बाईक असो आपण आतापर्यंत हे सर्व चित्रपटात पाहत आलो आहे मात्र या अशक्य गोष्टी शक्य होऊ लागल्या आहेत. जे की याच एक उदाहरण म्हणजे डेट्रॉईट ऑटो शोच्या २०२२ मध्ये उपस्थित असणाऱ्या लोकांना पाहायला मिळाले. XTurismo फ्लाइंग बाईक या शोमध्ये जे उपस्थित होते त्यांना पाहायला मिळाले मात्र त्यांच्या तोंडात एक शब्द होता तो म्हणजे अशक्य. मात्र XTurismo फ्लाइंग बाईक ने हे तंत्रज्ञानाच्या कौशल्यावर करून दाखवले आहे.

Updated on 19 September, 2022 4:14 PM IST

लँड स्पीडर फॉर द डार्क साइड टोपण नावाने ओळखले जाते :-

XTurismo ला एक टोपण नावाने ओळखले जाते ते म्हणजे लँड स्पीडर फॉर द डार्क साइड. हे एक हायब्रीड हॉवर बाईक आहे जे की महागडी किंमतमुळे ती सध्या रस्त्यावर येऊ शकत नाही. या बाईक बरेच अडथळे पार करावे लागले आहेत जे की या गाडीची क्षमता सुद्धा अविश्वसनीय आहे. या गाडीच्या याच कौशल्यामुळे शोमध्ये लोक मोठ्या प्रमाणात होती.

हेही वाचा:-पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असेल तर मिळेल या सरकारी योजनेतून नुकसान भरपाई.

आपत्कालीन परिस्थितीत बाईकचा मोठ्या प्रमाणात वापर :-

सध्या या बाईक ची किंमत सव्वा कोटी रुपये आहे. मात्र ही बाईक ही एक मजेच साधन नाही तर हे एक गरजवंतांना तसेच सुरक्षा यंत्रणा पोहचवण्यासाठी होऊ शकते. अगदी आपत्कालीन गरज असेल तर या बाईक चा उपयोग फारच फायदेशीर होऊ शकणार आहे. जे की अगदी आपत्कालीन गरजेदरम्यान या बाईक चा किती फायदा होऊ शकतो याची कल्पना आपण याच्या गतीचा अंदाज लावू शकतो.

हेही वाचा:-जाणून घ्या लिंबाचे लोणचे खाण्याचे जबरदस्त फायदे, वाचून बसणार नाही विश्वास.

या वेगाने धावू शकते बाईक :-

XTurismo ही बाईक एक गॅसोलीन-इलेक्ट्रिक हॉवरबाईक आहे जे की कावसकी हायब्रीड इंजिनवर चालते. या बाईकचा आवाज सुद्धा खूप मोठा आहे. या बाईकची उत्पादन क्षमता वाढपर्यंत याचा आवाज कमी होईल असे सांगण्यात आले आहे. फायबर चा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. ही बाईक जास्तीत जास्त ६० च्या वेगाने धावू शकते. बाईक चे वजन ३०० किलो आहे.

English Summary: Dad! A flying bike is coming to meet you, you will be shocked to hear the price
Published on: 19 September 2022, 04:14 IST