भारतात इलेक्ट्रिक वाहनांची रेलचेल वाढत चालली आहे. प्रत्येक ऑटोमोबाईल कंपनी इलेक्ट्रिक वाहने तयार करण्यावर भर देत आहेत. इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी म्हणून नावारूपाला आलेली ओला इलेक्ट्रिक देखील बाजारात स्कूटर आणल्यानंतर आता Electric Car ची निर्मिती करत आहे. स्कूटरला मिळालेल्या प्रतिसादामुळे आता OLA ELECTRIC कंपनीने Electric Car आणण्याचा निर्धार केला आहे.
माहीतीनुसार, देशातील तमिळनाडू येथील ओल फ्युचर फॅक्टरीमध्ये कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी सर्व ग्राहकांशी संपर्क करून फॅक्टरी व्हिजिट देण्याच्या निमित्ताने या इलेक्ट्रिक कारचा टीझर व्हिडिओ देखील जारी केला, ज्यामध्ये या आकर्षक कारची झलक दिसते. रिपोर्ट्सनुसार, ओला इलेक्ट्रिक कार स्केटबोर्ड प्लॅटफॉर्मवर डेव्हलप केली जाणार आहे.
हे आर्किटेक्चर विशेषत: इलेक्ट्रिक मोटर्स, बॅटरी आणि इलेक्ट्रिक घटकांसाठी डेव्हलप केलं गेलं आहे. कारचा परफॉर्मन्स उत्तम देण्याकडे विशेष लक्ष दिलं जाणार आहे. यासाठी बॅटरी रेंज 300 किमी पेक्षा जास्त असू शकते आणि किंमतीबद्दल सांगायचं झालं तर 10 लाखांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.
OLA इलेक्ट्रिक कारबद्दल सध्या जास्त माहीती उपलब्ध नसली तरी ही कार भविष्यातील काही लागणाऱ्या फिचर्सची गरज आताच भागवेल, असं सांगितलं जातं आहे. पुढील काही महिन्यांत अधिक माहीती समोर येईल. तर अंदाजानुसार आगामी 2 वर्षांमध्ये ओलाची ही पहिली इलेक्ट्रिक कार बाजारात येऊ शकते.
Published on: 24 June 2022, 04:58 IST