Automobile

सिट्रोइन ही फ्रेंच ऑटो कंपनी असून या कंपनीने नुकताच ओली या इलेक्ट्रिक कारचा लुक रिव्हील केला असून हे कारचा एका चार्जमध्ये 100 किमी धावेल. या कारमध्ये 40 किलो वॅटची बॅटरी आणि सिंगल इलेक्ट्रिक मोटर देण्यात आले आहे.

Updated on 03 October, 2022 10:29 AM IST
AddThis Website Tools

सिट्रोइन ही फ्रेंच ऑटो कंपनी असून या कंपनीने नुकताच ओली या इलेक्ट्रिक कारचा लुक रिव्हील केला असून हे कारचा एका चार्जमध्ये 100 किमी धावेल. या कारमध्ये 40 किलो वॅटची बॅटरी आणि सिंगल इलेक्ट्रिक मोटर देण्यात आले आहे.

नक्की वाचा:Car News: लवकरच येणार 'रेनॉल्ट'ची 'ही' इलेक्ट्रिक कार, वाचा या कारची जबरदस्त वैशिष्ट्ये

 या कारची वैशिष्ट्ये

 या कारमध्ये एक महत्वाचे वैशिष्ट्य देण्यात आले आहे म्हणजे या कारचे रूफ आणि बोनेट पारंपारिक धातू किंवा स्टीलच्या ऐवजी कार्डबोपर्डचे बनलेले आहे. म्हणजे एक सामान्य कार्डबोर्ड नसून  एक विशेष प्रकारचे हनीकॉम्ब स्वरूपाचे बनवले आहे.

एवढेच नाही तर कारच्या मजबुतीसाठी प्लास्टिक कोटिंग देखील करण्यात आले आहे.याचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कंपनीने हे  रासायनिक कंपनी बीएसएफ सोबत भागीदारी करून तयार केले आहे.

नक्की वाचा:Car News: मारुतीची पहिलीच हायब्रीड इंजिनवाली कार लॉन्च, वाचा मायलेज आणि किंमत

दुसरे महत्त्वाचे म्हणजे या कारच्या व्हर्टिकल विंडस्क्रीन डिझाईनमुळे काच आणि वजन देखील कमी झाली आहे. विशेष म्हणजे ओली कार रिसायकल आणि सहजपणे दुरुस्त देखील करता येते जी येणाऱ्या तीन पिढ्या किंवा सुमारे पन्नास वर्षे चांगली टिकू शकते.

या कारची किंमत

 जर आपण युरोपियन बाजाराचा विचार केला तर युरोपीय बाजारात या कारची किंमत 23 हजार पौंड म्हणजेच वीस लाख 51 हजार रुपये ठेवण्यात आली आहे.

नक्की वाचा:Bike News: 'कावासाकी'ने बाजारपेठेत आणली 'ही' दमदार बाईक, वाचा या बाईकची किंमत आणि दमदार वैशिष्ट्ये

English Summary: citrozen reveal new electric car oli with so many atttractive feature
Published on: 03 October 2022, 10:29 IST