सध्या नव्या गाड्या घेण्यापेक्षा अनेकजण हे जुन्या गाड्या घेण्यावर अधिक भर देत आहेत. याचे कारण म्हणजे गाड्यांच्या वाढलेल्या किमती. जरी जुन्या गाड्या घेतल्या तरी त्या चांगल्या स्थितीत आहेत का हे तपासणे गरजेचे आहे. विशेषतः प्रवास लांबचा असो की, जवळचा कारचे टायर चांगले आहेत का? हे तपासणे गरजेचे आहे.
अनेकदा टायर पंक्चर झाले तर प्रवासात अडचणी निर्माण होऊ शकतात. अनेकदा टायर फुटून मोठे अपघात घडतात. जुने टायर वापरल्याने रस्त्यावर अधिक घर्षण निर्माण होते, परिणामी इंधनाचा वापर जास्त होतो. याशिवाय त्याचा स्फोट देखील होण्याची शक्यता असते.
कारच्या टायर्सचे लाईफ तपासण्यासाठी नाणी वापरली जाऊ शकतात. हे तपासण्यासाठी तुम्ही खिशात एक रुपया ठेवूनही करू शकता. एक सामान्य टायर सरासरी पाच वर्षे टिकतो. जर ते फॅक्टरीत तयार केलेले असेल तर ते 40 ते 50 हजार किमी पर्यंत चालतात.
शेतकऱ्यांनो आता पीव्हीसी पाईपसाठी मिळणार ३० हजार रुपये, असा घ्या लाभ..
तुमच्या रोडच्या परिस्थितीवर देखील बरेच गणित अवलंबून असते. तसेच रफ ड्रायव्हिंगमुळे अधिक घर्षण होते, ज्यामुळे टायर अधिक लवकर झिजतात. टायरचे आयुष्य तपासण्यासाठी प्रथम एक नाणे घ्या आणि ते टायरच्या गॅपमध्ये टाका, नाणे जितके जास्त पकडीच्या आत जाईल तितके टायर जास्त काळ टिकेल.
तुम्ही फक्त 'येस सर' म्हणायचं आणि ... ! गडकरींनी अधिकाऱ्यांना झाप झाप झापलं
नाणे एक चतुर्थांश आतमध्ये गेलेले राहते. टायर झिजल्याने किंवा संपल्याने नाणे गॅपच्या पकडीत कमी जाते. सध्या टायरमध्ये आत पिवळी पट्टी देण्यात आली आहे. कालांतराने हा पिवळा पट्टी टायरच्या झीजमुळे दिसू लागते. याचा अर्थ असा की टायर बदलण्याची वेळ आली आहे.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! लंम्पी त्वचेच्या रोगावर लस आली
ऊस उत्पादक शेतकऱ्यांची होणार जंगी कमाई, शेतकऱ्यांनो आलीय नवीन टेक्निक, जाणून घ्या...
टाटाची सर्वात स्वस्त CNG कार लॉन्च, मायलेजमुळे संपणार महागड्या पेट्रोलचे टेन्शन, जाणून घ्या..
Published on: 16 August 2022, 02:44 IST