Automobile

बीएमडब्ल्यूने नवीन स्पोर्ट बाईक लॉन्च केली आहे. या बाईकचे नाव G 310 RR असे असून या बाईची सुरुवातीची किंमत दोन लाख 85 हजार रुपये आहे. ही स्पोर्ट बाईक संपूर्ण देशभरातील BMW Motorrad इंडिया स्टोअर्सवर उपलब्ध असणार आहे. विशेष म्हणजे ही बाईक भारतात तामिळनाडू येथील होसुर मध्ये बनवली गेली आहे.

Updated on 20 July, 2022 4:16 PM IST

बीएमडब्ल्यूने नवीन स्पोर्ट बाईक लॉन्च केली आहे. या बाईकचे नाव G 310 RR असे असून या बाईची सुरुवातीची किंमत दोन लाख 85 हजार रुपये आहे. ही स्पोर्ट बाईक संपूर्ण देशभरातील BMW Motorrad इंडिया स्टोअर्सवर उपलब्ध असणार आहे. विशेष म्हणजे ही बाईक भारतात तामिळनाडू येथील होसुर मध्ये बनवली गेली आहे.

 बीएमडब्ल्यू आणि टीव्हीएस मोटर्सने सोबत मिळून बनवली ही बाईक

बीएमडब्ल्यू आणि टीव्हीएसने एकत्र येऊन ही बाईक बनवली आहे.BMW G310 RR ही बाईक  टीव्हीएस अपाची RR 310 ची पुढची आवृत्ती असून यापूर्वी देखील बी एम डब्ल्यू आणि टी व्ही एस ने तामिळनाडूच्या होसुर मध्ये BMW G 310 R आणि G310 GS स्पोर्ट बाईक बनवलेली आहे.

नक्की वाचा:बाईक खरेदी करताय? तर नितीन गडकरींची ही मोठी घोषणा पहाच; होईल मोठा फायदा...

2.9 सेकंदात घेते 0 ते 60 किमी/ ताशी वेग

 ही बाइक अतिशय उच्च तंत्रज्ञान इंजिन द्वारे तयार केलेली आहे. या बाईक मध्ये 313 सी वॉटर कुल्ड इंजिन, सिंगल सिलेंडर फोर स्ट्रोक इंजिन आहे. तसेच या बाईक मध्ये इलेक्ट्रॉनिक इंधन इंजेक्शन प्रणाली मिळणार आहे. ही बाइक अवघ्या  2.9 सेकंदात 0 ते 60 किमी प्रति तास चा वेग गाठू शकते. 

या  कमाल पावर 9700rpm वर 25 kWपर्यंत जाऊ शकते.त्याचा स्पीड गिअर बॉक्स बाईक रायडरला उच्च वेगातही सहजपणे गिअर्स बदलू देतो.

नक्की वाचा:BMW Mercedes या ठिकाणी मिळतायेत अतिशय कमी किंमतीत, किंमत ऐकून तुम्हीही….

या बाईक मध्ये आहेत चार मोड

या बाईक मध्ये 4 मोड उपलब्ध आहे त्यामध्ये ट्रॅक,अर्बन,रेन आणि स्पोर्ट मोडचा समावेश आहे.म्हणजे बाईक रायडर बाईक चालवण्याचा वेगानुसार मोड सेट करू शकतो.

ट्रॅक मोड बद्दल बोलायचे झाले तर बाईक चा वेग वाढवणे आणि वेग कमी करणे हे आहे. तिची अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम जेव्हा तीव्र वळण येते तेव्हा आपोआप हळू ब्रेक करते. अर्बन मोड हा बाईकला संतुलित वेगाने चालवण्यास मदत करतो.

बाईक स्पोर्ट मोडमध्ये सर्वात्तम गती देते तर रेन मोडमध्ये बाय  वायर सिस्टीम आणि एबीएसच्या मदतीने रायडर ओलसर  रस्त्यावरही पूर्ण नियंत्रणास सह बाईक चालवू शकतो त्यामुळे दुचाकीस्वाराला सुरक्षित प्रवासाचा अनुभव येतो.

ई बाइक दोन रंगांमध्ये उपलब्ध असून पहिला म्हणजे स्टॅंडर्ड ब्लॅक कलर व दुसरा म्हणजे स्टाईल स्पोर्ट चा समावेश आहे. ज्यामध्ये लाईट व्हाईट युनि, रेसिंग ब्लू मेटॅलिक  आणि रेसिंग रेड युनी हे रंग आहेत.

नक्की वाचा:Royal Enfield: रॉयल एनफील्डची ही 2 लाखांची बाईक मात्र 22 हजारात खरेदी करता येणार, कसं ते वाचा

English Summary: bmw g 310 rr sport bike is come with strong and powerful engine and design
Published on: 20 July 2022, 04:16 IST