2023 Range Rover Sport SUV: कोव्हिड-१९ आणि लॉकडाऊननंतर आता भारतीय वाहन बाजार रुळावर आला आहे. त्यामुळे आता स्वस्त, मिड रेंज सेगमेंटसह लग्झरी वाहन उत्पादक कंपन्यादेखील भारतात सातत्याने महागड्या लग्झरी गाड्या लाँच करु लागल्या आहेत.
लँड रोव्हर (Land Rover) या लग्झरी वाहन उत्पादक कंपनीने नुकतीच भारतात त्यांनी नवीन एसयूव्ही (SUV) 2023 रेंज रोव्हर स्पोर्ट (2023 Range Rover Sport) लाँच केली आहे. ही कार आता कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटवर लिस्ट करण्यात आली आहे.
नवीन 2023 रेंज रोव्हर स्पोर्टच्या बेस व्हेरिएंटची किंमत भारतात 1.64 कोटी रुपये (एक्स-शोरूम) इतकी निश्चित करण्यात आली आहे. नवीन 2023 रेंज रोव्हर स्पोर्ट एसयूव्ही भारतात चार व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. यामध्ये एसई, एचएसई, ऑटोबायोग्राफी आणि फर्स्ट एडिशन या मॉडेल्सचा समावेश आहे.
चार व्हेरिएंट्स आणि त्याच्या किंमती
या कारचं बेस मॉडेल म्हणजेच SE व्हेरिएंटची किंमत 1.64 कोटी रुपये इतकी आहे. तर या कारच्या टॉप व्हेरिएंटसाठी म्हणजेच फर्स्ट एडीशनसाठी ग्राहकांना तब्बल 1.84 कोटी (सर्व किंमती एक्स-शोरूम) रुपये मोजावे लागतील. दरम्यान, कंपनीने या कारसाठी बुकिंग्स घेण्यास सुरुवात केली आहे. या कारची डिलिव्हरी नोव्हेंबर 2022 मध्ये सुरू होईल अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा : भारतात जीप मेरिडियन SUV आज लाँच होणार,उत्तम फीचर्ससह दमदार इंजिन जाणून घ्या इतर माहिती
दमदार इंजिन
रेंज रोव्हर ही कंपनी जबरदस्त इंजिनसाठी प्रसिद्ध आहे. कंपनीने या कारमध्येदेखील एक दमदार इंजिन दिलं आहे. रेंज रोव्हर स्पोर्टमध्ये ऑटोमॅटिग ट्रान्समिशनसह 3.0 लीटर माईल्ड हायब्रिड डिझेल इंजिन दिलं आहे. हे इंजिन 3.0 लीटर 6 सिलेंडर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन 346 एचपी पॉवर आणि 700 न्यूटन मीटर पीक टॉर्क जनरेट करू शकतं.
Published on: 19 May 2022, 10:56 IST