नवी मुंबई : TVS ज्युपिटर ही भारतीय बाजारपेठेतली एक लोकप्रिय आणि मध्यमवर्गीय लोकांची आवडती स्कूटर आहे. या स्कूटरमध्ये आधुनिक फिचर्ससोबतच तुम्हाला जबरदस्त मायलेजही मिळते यामुळे ही स्कूटर एक बेस्ट सेलिंग स्कूटर म्हणून उदयास आली आहे.
आम्ही तुम्हाला इथे सांगू इच्छितो की कंपनी या स्कूटरमध्ये मजबूत इंजिन देते. बाजारात या स्कूटरची सुरुवातीची किंमत 68,571 आहे जी 82,346 पर्यंत जाते. मात्र टीव्हीएस ज्युपिटर ही स्कूटर खरेदी करण्यासाठी जर आपल्याकडे पुरेशी रक्कम उपलब्ध नसेल तर चिंता करू नका.
कारण आज आम्ही आपणासाठी एक विशेष ऑफर घेऊन आलो आहोत. ज्या ऑफरच्या मदतीने आपण टीव्हीएस ज्युपिटर ही स्कूटर अतिशय कमी किमतीत खरेदी करू शकता. मित्रांनो देशात अनेक जुन्या टू व्हीलर ऑनलाइन खरेदी आणि विक्री करणाऱ्या वेबसाइट्स आहेत ज्या ठिकाणी टीव्हीएस ज्युपिटर या स्कूटरवर चांगली भन्नाट ऑफर दिली जातं आहे. आज आम्ही तुमच्यासाठी अशाच काही डीलशी संबंधित माहिती घेऊन आलो आहोत.
आनंदाची बातमी! पोस्ट ऑफिसच्या या योजनेतून मिळतील 29 हजार 700 रुपये; वाचा याविषयी
QUIKR वेबसाइटवर ऑफर:
TVS ज्युपिटरचे 2014 मॉडेल QUIKR वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. या ठिकाणी या स्कूटरवर भन्नाट ऑफर दिली जातं आहे. या साईटवर ही स्कूटर 14,000 च्या किमतीत उपलब्ध करण्यात आली आहे.
OLX वेबसाइटवर ऑफर:
TVS ज्युपिटरचे 2015 मॉडेल OLX वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. या ठिकाणी देखील या स्कूटरवर सर्वोत्तम डील मिळत आहे. येथे अतिशय कमी किमतीत टीव्हीएस ज्युपिटर सेकंड हॅन्ड स्कूटर खरेदी केली जाऊ शकते. ही स्कूटर येथे 17,000 च्या किमतीत उपलब्ध करण्यात आली आहे.
Royal Enfield: रॉयल एनफिल्ड इलेक्ट्रिक बुलेट लाँच करणार; वाचा याविषयी
ड्रूम वेबसाइटवर ऑफर:
TVS ज्युपिटरचे 2015 मॉडेल Droom या वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे. या ठिकाणी देखील टीव्हीएस ज्युपिटर सेकंड हॅन्ड स्कुटर अतिशय कमी किमतीत उपलब्ध आहे. ही स्कूटर येथे 27,580 च्या किमतीत उपलब्ध करण्यात आली आहे. या वेबसाईटवर फायनान्स सुविधा देखील उपलब्ध आहे.
85 हजाराची 'ही' भन्नाट स्कूटर खरेदी करा मात्र 25 हजारात; जाणुन घ्या कुठं मिळतेय ही ऑफर
TVS ज्युपिटरची वैशिष्ट्ये:
TVS ज्युपिटरमध्ये सिंगल सिलेंडरसह 109.7 सीसी इंजिन उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे इंजिन 8.8 Nm पीक टॉर्कसह 7.88 PS जास्तीत जास्त पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे. या स्कूटरला उत्तम ब्रेकिंगसाठी, पुढील आणि मागील दोन्ही चाकांमध्ये ड्रम ब्रेक लावण्यात आले आहेत. यासोबतच तुम्हाला या स्कूटरमध्ये अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर देखील मिळतात. एआरएआयने प्रमाणित केल्यानुसार, एका लिटर पेट्रोलमध्ये ही स्कूटर 64 किमीपर्यंत धावू शकते.
Published on: 18 May 2022, 10:23 IST