Animal Husbandry

भारतामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय केला जातो.परंतु कोणत्याही व्यवसायाप्रमाणे पशुपालन व्यवसायामध्ये देखील समस्या असतातच.गाय आणि म्हशी सारख्या जनावरांना होणारे आजार एक प्रमुख समस्या असते. परंतु जनावरांचे बारकाईने निरीक्षण केल्यास या निरीक्षणावरून जनावरांना कोणत्या प्रकारचा आजार झाला आहे याचा ढोबळ मानाने अंदाज बांधता येतो व या पद्धतीने उपचार देखील करता येतात व होणाऱ्या नुकसानीपासून वाचता येते. या लेखात आपण बाह्य निरीक्षणावरून आजार कसे ओळखायचे ही माहितीघेऊ.

Updated on 18 November, 2021 8:35 PM IST

भारतामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय केला जातो.परंतु कोणत्याही व्यवसायाप्रमाणे पशुपालन व्यवसायामध्ये देखील समस्या असतातच.गाय आणि म्हशी सारख्या जनावरांना होणारे आजार एक प्रमुख समस्या असते. परंतु जनावरांचे बारकाईने निरीक्षण केल्यास या निरीक्षणावरून जनावरांना कोणत्या प्रकारचा आजार झाला आहे याचा ढोबळ मानाने अंदाज बांधता येतो व या पद्धतीने उपचार देखील करता येतात व होणाऱ्या नुकसानीपासून वाचता येते. या लेखात आपण बाह्य निरीक्षणावरून आजार कसे ओळखायचे ही माहितीघेऊ.

बाह्य निरीक्षणातून ओळखा आजार

  • जनावरांची कासेचे निरीक्षण करताना ती सर्वसाधारण आहे का?कासेवर सूज आलेली आहे का? याचे निरीक्षण करावे जेणेकरून कासदाह यावर तात्काळ उपचार करणे शक्य होते.तसेच कासेच्या कमी होणार या आकाराकडे ही लक्ष ठेवावे. जेणेकरून कोणत्यातरी घटकाची कमतरता असल्यामुळे किंवा कासेचा आजार लक्षात येऊन दूध उत्पादनात होणारी घट राहता येते.
  • जनावरांच्या शेपटीचे निरीक्षण करताना शेपटी वरचे केस कमी होत आहेतका?किंवा शेपटीच्या गोंड्याचे पूर्ण केस गेले आहेत का? याचे व्यवस्थित निरीक्षण करावे. यावरून शेपटीला जंतुसंसर्ग,  सरड्या या रोगाचे योग्य निदान करून उपचार करणे शक्य होते.
  • जनावरांचे निरीक्षण करताना जनावरांच्या शरीरावर कुठे सूज आहे का? उदाहरणार्थ पुढच्या दोन्ही पायांच्या मध्ये,जबड्याच्या इत्यादी ठिकाणी पहावे.यावरून दोन्ही पायांच्या मध्ये सूज असल्यास पोटात गेलेली अखाद्य वस्तू, जबडे खाली सूज वरून घटसर्प,जंत प्रादुर्भाव याचे निदान करता येते.
  • दोन्ही डोळ्यांचे निरीक्षण करताना डोळे पाणीदार, टवटवीत आहेत का? डोळ्यातून स्त्राव किंवाघाणयेत आहे का? याची व्यवस्थित निरीक्षण करावे तसेच डोळे पांढरे, निळे झाले आहेत का?  त्याची व्यवस्थित निरीक्षण करावे. या निरीक्षणावरून डोळ्याला लागलेला मार लक्षात येऊन वेळीच उपचार होतात.  बऱ्याच वेळा इतर आजारांमुळे देखील जनावरांच्या डोळ्यातून पाणी येताना दिसते.
  • तसेच जनावरांच्या नाकपुडी चे निरीक्षण करतानानाकपुडी जर कोरडी असेल तर जनावर आजारी आहे हे समजावे. नाकपुडी जर पाणीदार असेल तर जनावरे निरोगी असल्याचे दर्शवते.
  • जनावरांच्या तोंडामधून सतत लाळ गळत असेल तर जनावरांच्या तोंडामध्ये जखम किंवा लाळ खुरकूत रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे हे समजावे. तसेच इतर लक्षणांची सांगड घालून त्याचे योग्य निदान होऊ शकते.
  • बऱ्याच गाई किंवा म्हशीजर शिंगे गोठ्यामध्ये गव्हाणी,भिंतीवर आदळतात. यावरून एक तर कानाच्या मधल्या भागाला सूज येऊन कानात पू तयार झाला आहे किंवा शिंगांचा कॅन्सरही असण्याची शक्यता असते.
  • काही जनावरे सतत दात खाताना त्यांचा आवाज येतो किंवा कण्हण्याचा आवाज येतो. तेव्हा अशा जनावरांमध्ये एकतर पोटशूळ किंवा इतर आजार असण्याची शक्यता असते.
  • म्हशीच्या अंगावर कधीकधी काळ्या कातडीवर पांढरे ठिपके दिसतात.कालांतराने या ठिपक्यांचा आकार हळूहळू वाढत जातो.अशा वेळी समजावे की कॉपर च्या कमतरतेमुळे हे पांढरे ठिपके दिसून येत आहे. अशावेळी पशुतज्ज्ञांकडून वेळेस उपचार करून घ्यावे.
English Summary: you can identified animal disease by outer observation of animal
Published on: 18 November 2021, 08:35 IST