जर दूध उत्पादनासाठी गाय खरेदी करण्याचा विचार करत असाल तर नुसती बाजारात जाऊन गाय खरेदी करणे योग्य नाही. त्या गाईला काही अंगाने पारखून घेणे कधीही फायद्याचे ठरते.
नाहीतर उगीचच पश्चाताप करण्याची वेळ येण्याची दाट शक्यता असते. आता यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी येतात. तसे पाहायला गेले तर या गोष्टी खूप छोट्या आहेत परंतु दूध व्यवसायाच्या पुढील भवितव्यासाठी खूपच महत्त्वाचे आहेत. या लेखामध्ये आपण गाईची निवड करताना कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात, याचे सविस्तर माहिती घेऊ.
गाईची निवड करताना विचारात द्यायच्या बाबी
1- अनुकूलन क्षमता- गाई तसे पाहायला गेले तर वेगवेगळे हवामानात जगू शकतात. परंतु गाईंची वाढ, त्यांची पुनरुत्पादन क्षमता आणि दूध उत्पादन क्षमतेचा विकास हा अनुकूल वातावरणातच पूर्ण होऊ शकतो. जर तुम्हाला गाईंची खरेदी करायचे असतील तर ती एखाद्या आठवडे बाजारातून खरेदी करणे कधीही उत्तम ठरते. व्यवसाय चे ठिकाण व खरेदीचे ठिकाणचे हवामान, चाऱ्याचा प्रकार या बाबतीत समानता राहील याची काळजी घ्यावी.
जर आपण गायींचा विचार केला तर बाह्य कीटक, आतड्यातील कृमी, सांसर्गिक रोग तसेच कातडीच्या विकाराला चांगल्या प्रकारे प्रतिकार करू शकतात. परंतु वेगवेगळे हवामान आतून खरेदी केलेल्या गाई नवीन ठिकाणच्या वातावरणाला, त्यातील चारा, पाणी, हवामान आणि व्यवस्थापन याला लवकर एकरूप होत नाहीत.
त्यामुळे अशा परिस्थितीत वेगळ्या हवा मनातून खरेदी केलेल्या गाई अशा गोष्टींना चांगला प्रतिकार करू शकतीलच असे नाही. या गोष्टींचा परिणाम गाईंच्या पुनरुत्पादन कार्यक्षमतेवर होऊन दूध उत्पादनात घट येऊ शकते. एवढेच नाही तर मृत्यूच्या प्रमाणात देखील वाढ होते व व्यवसाय यशस्वी होत नाही. म्हणून आपल्या परिसरातीलच व आपल्याकडील हवामानात तग धरू शकणारी गाईची निवड करणे महत्त्वाचे आहे.
2- गाईची जात- अशा जातींची निवड करावी कि ती जात आपल्या परिसरातील चारा, हवामान आणि पाणी या गोष्टीला एकरुप होऊ शकतील अशा दुधाळ गायींच्या जातींची निवड करणे महत्त्वाचे आहे. गाईची निवड करताना तिचा जातिवंत गुणधर्म किती आहे यापेक्षा ती दूध उत्पादनात किती सरस आहे, या गोष्टीला प्राधान्य द्यावे. तुमच्या गाईच्या गोठ्यातील सरासरीपेक्षा 20 टक्के अधिक दूध देणाऱ्या गाई ची निवड व खरेदी करावी.
3- हंगाम- जेव्हा तुमच्याकडे नैसर्गिक चारा, वैरण मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या विताच्या हंगामात गाय खरेदी कराव्यात व बाजारातील दुधाच्या किंमत यांचाही त्यावेळचा विचार करावा.
4- गाईची शारीरिक अवस्था- विण्यापूर्वी आणि व्याल्यानंतर दोन आठवड्याच्या काळात गाईची खरेदी व वाहतूक करू नये. यामुळे गाभन गाईचा गर्भपात होऊ शकतो किंवा लहान वासराला वाहतुकीचा आणि नवीन वातावरणाचा लहान वासरांना त्रास होऊन ते दगावू शकतात. परंतु गाभण गाय खरेदी करू नयेत. त्यामुळे गर्भधारणेसाठी कोणता वळू वापरला आहे याची माहिती कळत नाही. तसेच व्यालेल्या गायी मी विताच्या दुसऱ्या महिन्यानंतर खरेदी करू नयेत.
नक्की वाचा:ब्रेकिंग: आत्ता पोटॅशची कमतरता होईल दूर अन युरियाचा वापर होईल कमी- केंद्र सरकारचा निर्णय
त्यानंतर दूध उत्पादनामध्ये घट संभवते. त्यामुळे खरेदी करताना विता च्या पहिल्या महिन्यातच खरेदी करावी.
5- गाईंची वय- गाय खरेदी करताना ती दुसऱ्या किंवा तिसऱ्या वितामधील खरेदी करावी. परंतु चौथ्या वितानंतर किंवा 10 वर्षे व यापुढील गाई खरेदी करू नयेत. तसेच कालवडी खरेदी करायची असेल तर सहा महिन्याच्या आतील करू नये.
अशावेळी तोंडातील दात शिंगागावरील वलय यावरून गायीच्या वयाचा अंदाज काढता येतो.
6- गाईचे आरोग्य- गाय खरेदी करताना ती अशक्त, अस्वस्थ, मंद निस्तेज डोळे असलेली व त्वचा काळवंडलेली असेल तर गाय खरेदी करू नये. शांत स्वभावाची, दोर न चघळणारी, स्वतःचे दूध स्वतः न पिणारी असावी. तसेच इतर काही आजार आहेत का जसे की स्तनदाह, बाळंतपणाचे विकार, बंदसड, त्वचेचे विकार काही शारीरिक दोष असतील तर अशी गाय खरेदी करू नये.
Published on: 26 March 2022, 09:50 IST