भारतातील केरळ राज्यामध्ये अशी एक गाय आहे की तिची उंची आणि लांबी यामुळे त्या गाई चा समावेश गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आला आहे.
या गाईचे लांबी ही अतिशय कमी असून हे गायकेरळमधीलअंतुली गावातील बाळकृष्ण यांच्याकडे आहे.
जाणून घेऊ या गाई विषयी
माणिक्यमगाईचे वय सहा वर्ष आहे. तर सहा वर्षे वय असलेल्या गाईची लांबी 61.5सेंटीमीटर आहे. केरळ मधील एन. व्ही. बालकृष्णनयांच्याकडे ही गाई असून तेथे एखाद्या घराच्या सदस्याप्रमाणे जवळ जवळ पाच वर्षापासून पालन-पोषण करीत आहेत.
पशुसंवर्धन डॉक्टर नायर यांनी या गाई बाबत माहिती देताना सांगितले की,ही गाय इतर गाई पेक्षा असामान्य स्वरुपाची असून ही गाय तिच्या कमी लांबी मुळे खूप प्रसिद्ध आहे.या गाई सोबत फोटो काढण्यासाठी फार दूरवरून लोक येऊन गर्दी करतात. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे या गाईचे दूध देखील उत्तम दर्जाचे आहे. ठिकाय केरळमधील वेचूर मध्ये सर्वप्रथम आढळली होती. त्यावरून ही गाय वेचुर प्रजातीची असल्याचे मानले जाते.
केरळ मधून वेचुर प्रजातीच गाय गायब झाली होती. कारण क्रॉस ब्रीडींगचे प्रमाण वाढल्याने वेचूरगाईंचे प्रमाण कमी झाले होते. या प्रजातींचे गाई या नामशेष होण्याच्या मार्गावर होत्या परंतु डॉक्टर सोस्सामा यांनी केलेल्या कामाच्या जोरावर गॅसवर गाईंचे संवर्धन झाले व 1989 मध्ये त्यांनी या कामासाठी सुरुवात केली.
Published on: 18 September 2021, 03:41 IST