नवी दिल्ली – महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी बँकांकडून अनेक विविध ऑफर दिले जातात. यातून महिला बँकेतून कमी व्याजदरात कर्ज मिळवून आपला व्यवसाय सुरू करू शकतात. आता अजून व्यवसाय त्यासाठी बँक महिलांना बक्कळ पैसा देत आहे. बँकेच्या मदतीने महिला आता डेअरी व्यवसायात आपलं स्थान निर्मित करू शकतील.
जर महिलांना डेअरीचा व्यवसाय करायचा असेल तर तुमच्यासाठी हा लेख खूप महत्वाचा आहे. डेअरी सुरू करण्यासाठी आपल्याकडे भांडवल नसेल तर काही घाबरू नका, कारण तु्मच्या मदतीसाठी सरकार धावून आले असून सरकार आपणास भक्कम मदत करत आहे.
इतकेच नाहीतर सरकार देत असलेल्या कर्जावर अनुदान देखील देत आहे. पशुपालन आणि डेअरी उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने dairy entrepreneur scheme राबवत आहे. या योजनेच्या अंतर्गत दहा म्हैशींची डेअरी सुरू करण्यासाठी सरकार ७ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज पशुधन विभागाच्या माध्यमातून दिले जाते. याशिवाय खुल्या वर्गातील डेअरी चालकांसाठी २५ टक्क्के अनुदान या कर्जावर मिळते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे महिलांना आणि एससी वर्गातील डेअरी चालकांसाठी ३३ टक्के अनुदान या कर्जावर मिळते. पशुपालन व्यवसाय हा अधिक नफा देणारा आहे.
पण या व्यवसायासाठी लागणारा खर्च अधिक असल्याने अनेकजण या व्यवसायापासून दूर जात असतात. यासाठी शेतकऱ्यांनी या व्यवसायाकडे वळावे यासाठी सरकार ही योजना राबवत आहे. ही योजना नाबार्ड मार्फत चालवली जात आहे. यातून गावातील युवकांना, महिलांना रोजगार आणि दुग्ध उत्पादनासाठी प्रोत्साहन मिळेल. दरम्यान भारत सरकारने ही योजना १ सप्टेंबर २०१० मध्ये सुरु केली होती. ज्या व्यक्तीला डेअरी सुरू करायची आहे त्याला फक्त १० टक्के रक्कम खर्च करावी लागणार आहे. तर ९० टक्के रक्कम सरकार खर्च करणार आहे. दरम्यान कर्ज घेणाऱ्यास मिळणारे अनुदान हे नाबार्ड मार्फत दिले जाते. हे अनुदान आपण ज्या बँकेतून कर्ज घेतले असेल त्याच बँकेत अनुदान मिळेल.
दरम्यान या योजनेचा आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर आपण वाणिज्यिक बँक, क्षेत्रिय बँक, राज्य सहकारी बँक, राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत तपास करु शकतात. कर्जासाठी आपल्याकडील काही जमिनीचे कागदपत्र तारण ठेवावे लागतात. यासह जातीचा दाखला, ओळखपत्र, आणि प्रमाणपत्र, आणि प्रोजेक्ट बिजझनेस प्लान, आणि फोटो द्यावा लागतो.
Published on: 18 August 2020, 06:37 IST