Animal Husbandry

भारताच्या विविध राज्यांमध्ये पशुपालन हा शेतीसोबत जोडलेला पूरक व्यवसाय आहे. मात्र, पंजाबचे शेतकरी ऍनिमल ब्रीडिंग (जनावरांच्या प्रजनन तंत्रज्ञान) मध्ये देशातील इतर राज्यांच्या तुलनेत अधिक पुढे मानले जातात. यामागे अनेक ठोस कारणं आहेत.

Updated on 26 August, 2025 12:45 PM IST

भारताच्या विविध राज्यांमध्ये पशुपालन हा शेतीसोबत जोडलेला पूरक व्यवसाय आहे. मात्र, पंजाबचे शेतकरी ऍनिमल ब्रीडिंग (जनावरांच्या प्रजनन तंत्रज्ञान) मध्ये देशातील इतर राज्यांच्या तुलनेत अधिक पुढे मानले जातात. यामागे अनेक ठोस कारणं आहेत.

वैज्ञानिक दृष्टीकोन आणि शिक्षण

पंजाबमध्ये शेतीसोबतच पशुपालन विषयक शिक्षण आणि जनजागृतीवर भर दिला जातो. कृषी विद्यापीठे, पशुवैद्यकीय महाविद्यालये आणि शासकीय प्रशिक्षण केंद्रांमुळे शेतकरी आधुनिक प्रजनन तंत्रज्ञानाशी परिचित झाले आहेत.

कृत्रिम रेतन (Artificial Insemination) चा व्यापक वापर

पंजाबमध्ये बहुतेक गायी–म्हशी कृत्रिम रेतनाद्वारे गाभण केल्या जातात. त्यामुळे उच्च दर्जाचे ब्रीड सहज उपलब्ध होतात आणि स्थानिक जनावरांचा दर्जाही सुधारतो.

शासकीय व खासगी योजनांचा लाभ-

राज्यातील शेतकरी विविध शासकीय योजनांचा लाभ घेतात. प्रगत ब्रीडिंग सेंटर, बल्क मिल्क कूलिंग युनिट्स आणि डेअरी को-ऑपरेटिव्हमुळे शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळते.

आर्थिक स्थैर्य व मार्केट उपलब्धता-

पंजाब हा दुधाच्या उत्पादनात अग्रणी राज्य आहे. येथे दुधाचे दर तुलनेने चांगले मिळतात, तसेच खरेदीसाठी मोठी डेअरी इंडस्ट्री असल्याने शेतकऱ्यांना आत्मविश्वास मिळतो.

उच्च दर्जाचे गायी–म्हशींचे वाण-

मुर्रा म्हैस हे जगप्रसिद्ध वाण पंजाबमधील असून त्याची दूध देण्याची क्षमता विलक्षण आहे. तसेच होल्स्टीन फ्रिजिअन, जर्सी यांसारख्या गायींचं संगोपन इथे यशस्वी ठरतं.

संशोधन व नाविन्याचा स्वीकार-

पंजाबचे शेतकरी नवीन तंत्रज्ञान पटकन आत्मसात करतात. एम्ब्रियो ट्रान्सफर टेक्नॉलॉजी (ETT), इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) यांसारख्या आधुनिक पद्धतीही इथे हळूहळू लोकप्रिय होत आहेत.

पंजाबचे शेतकरी ऍनिमल ब्रीडिंगमध्ये पुढे असण्यामागे शिक्षण, जागरूकता, शासकीय मदत, उच्च दर्जाची वाणं आणि बाजारपेठेची उपलब्धता ही प्रमुख कारणं आहेत. या प्रगत दृष्टिकोनामुळे पंजाब आज देशातील डेअरी हब म्हणून ओळखला जातो.

लेखक- नितीन रा.पिसाळ

पशुसंवर्धन सल्लागार

फार्मर द जर्नलिस्ट, कृषि जागरण.

English Summary: Why are Punjab farmers ahead in animal breeding?
Published on: 26 August 2025, 12:45 IST