Animal Husbandry

जनावराचा पाठीचा कणा वाकलेला असू नये. जनावरांची पहिली बरगडी दिसते स्वाभाविक असले तरी तिसरा बरगडी पर्यंत दिसणारी जनावरे अशक्त या प्रकारात मोडतात. गायीच्या पोटाचा तसेच छातीचा भाग लांब, खोल आणि रुंद असावा.उत्तम खाद्य पचवण्याची क्षमता असलेल्या जनावरांची निवड करावी. कास आणि सडाची तपासणी करावी.कासेची खोली मापक व क्षमता पुरेशी असावी.

Updated on 09 April, 2024 3:25 PM IST

दुग्ध व्यवसायासाठी बाजारातून जनावरे विकत घेताना अनेक गोष्टीवर लक्ष्य देणे आवश्यक आहे.त्यात महत्वाचे म्हणजे पशुपालकांची गरज,त्याची आर्थिक क्षमता,पाणी व हिरव्या चाऱ्याची उपलब्धता या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याकडील उपलब्ध परिस्थिती तसेच दुधाळ जनावराची कोणती जात नफा देऊ शकेल अशी जात निवडावी.

जर फक्त दूध उत्पादन हाच पशुपालकाचे हेतू असेल तर म्हैस पालन करणे कधीही उत्तम ठरते. या लेखात आपण दुधाळ जनावरांची निवड करताना कोणती काळजी घ्यावीया विषयी माहिती घेऊ.

दुधाळ जनावरांची निवड कशी करावी

जनावराचा पाठीचा कणा वाकलेला असू नये. जनावरांची पहिली बरगडी दिसते स्वाभाविक असले तरी तिसरा बरगडी पर्यंत दिसणारी जनावरे अशक्त या प्रकारात मोडतात. गायीच्या पोटाचा तसेच छातीचा भाग लांब, खोल आणि रुंद असावा.उत्तम खाद्य पचवण्याची क्षमता असलेल्या जनावरांची निवड करावी. कास आणि सडाची तपासणी करावी.कासेची खोली मापक व क्षमता पुरेशी असावी. सड काशेच्या प्रत्येक चतुर्थांश प्रमाणबद्ध असावी. काटकोनात स्थित असावेत. मागील कास उंच,रुंद व घट्टपणे शरीराशी संलग्न असावी. किंचित वर्तुळाकार पद्धतीने मुळास जोडलेली असावी कासेचे विभाजन पुरेशा प्रमाणात संतुलित असावे. पुढची खास संलग्न घट्टपणे संलग्न असून त्याची लांबी मध्यम आणिक्षमता पुरेशी असावी. सड दंडगोलाकार, एक समान आकाराचे व मध्यम लांबी आणि व्यास असावा. कासेस चार व्यतिरिक्त अधिक सड असू नये. सडातून हृदयाकडे जाणारी रक्तवाहिनी प्रशस्त व फुगीर असावेत.

जनावरांच्या दातांची पाहणी करूनवयाची याची खात्री करता येते. या वयातील जनावरे चार दाती असतात. जनावरांच्या गर्भपाताच्या घटनेचे प्रमाण तसेच कासदाह आजाराचा प्रादुर्भाव कधी झाला होता का याची माहिती घ्यावी. चारही सड पिळुन पाणी उत्तम यामुळे सडनलीका बंद नाही याची खात्री होते.

अनेक आजारांचे जनावरांच्या बाह्य लक्षणावरून निदान केले जाऊ शकते जसे की डोळ्यातून अथवा नाकातून स्राव येणेहे जनावर आजारी असल्याचे लक्षण आहे. तसेच योनीमार्ग अथवा गुद्दारातून रक्त किंवा अस्वाभाविक स्रावयेणे योनीच्या आजाराचे लक्षण आहे. आजारी जनावर सुस्त,मलूलव अशक्त झालेली असते.काही आजारात बाह्य लक्षणे दिसून येत नाहीत. आजारापासून वाचण्यासाठी जनावरांची नियमित लसीकरण केले जाते का याची चौकशी करावी. व तसेच पशु वैद्यकीय प्रमाणपत्र दाखवण्याचा आग्रह करावा.

आपल्याकडे होलीस्टन संकरित आणि जर्सी संकरित गाई दिसतात. होलिस्टन गायीचे दुधाचे प्रमाण अधिक आहे तर जर्सी संकरित गाईच्या दुधात स्निग्धांश अधिक असते. गरजेप्रमाणे जर्सी किंवा हॉलिस्टन गाईची निवड करावी. संकरित गाई घेताना पाणी आणि चाऱ्याची उपलब्धता लक्षात घेता विदेशी रक्ताचे प्रमाण 62:50 टक्क्यांपेक्षा अधिक असू नये. जर्सी संकरित गाई डोंगराळ भागात संगोपनासाठी चांगले आहेत तर होलिस्टन संकरित गाईचे संगोपन पठारी भागात करावे.

English Summary: What precautions should be taken while buying milch animals from the market
Published on: 09 April 2024, 03:25 IST