Animal Husbandry

हिवाळ्यामध्ये गाई म्हशी विण्याचे प्रमाण जास्त असते. या काळातील थंड वातावरणामुळे वासरांचे व्यवस्थित व्यवस्थापन ठेवणे गरजेचे असते. नवजात वासरांचे उत्तम व निरोगी आरोग्यासाठी अति उत्तम आहार म्हणजे गाईच्या प्रथम चीक हा होय.

Updated on 07 October, 2020 5:42 PM IST


हिवाळ्यामध्ये गाई म्हशी विण्याचे प्रमाण जास्त असते. या काळातील थंड वातावरणामुळे वासरांचे व्यवस्थित व्यवस्थापन ठेवणे गरजेचे असते. नवजात वासरांचे उत्तम व निरोगी आरोग्यासाठी अति उत्तम आहार म्हणजे गाईच्या प्रथम चीक हा होय.  या चिकमुळे वासरांच्या शरीरात अँटीबॉडीज व प्रतिकारक पेशी मुबलक प्रमाणात तयार होतात. त्यामुळे वासरांच्या संगोपनामध्ये चीक व्यवस्थापन महत्त्वाचे भूमिका बजावते.

वासरांच्या योग्य संगोपन ना मुळे भविष्यात उत्तम दुग्धजन्य गायी तयार होतात. हा चिकाचा आहार पहिल्या २४ तासात व पहिल्या महिन्यामध्ये वासरांची रोगप्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे वाढविण्यास मदत करते.  गर्भधारणे दरम्यान वासराला अँटीबॉडीज पुरवठा अतिशय कमी प्रमाणात होतो. त्यामुळे वासरांमध्ये जन्मजात रोगप्रतिकारक क्षमता कमी असते. नैसर्गिकरित्या ही कमतरता भरून काढण्यासाठी वासराला गाईचा चिक देणे फायद्याचे असते. यामध्ये एंटीबॉडी व रोगप्रतिकारक प्रतिकारक पेशी मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे नवीन जन्मलेल्या वासरांमध्ये आजारांपासून वाचण्याचे ताकत शरीरात निर्माण होते. जन्मानंतर वासरांच्या आतड्यात एक विशिष्ट गुणधर्म असतो.  त्यामुळे इम्युनोग्लोबुन हा आतड्यामार्फत थेटपणे रक्तप्रवाहात शोषून घेतो. वासरांच्या जन्मानंतर काही तासातच वासराच्या आहार व्यवस्थापनात चिकाचा समावेश केल्यामुळे जनावरांची भविष्यातील दुग्ध उत्पादन क्षमता चांगली राहते.

 


प्रजनन परिपक्वता वाढीसाठी आणि वजन लवकर वाढवण्यासाठी चीक उपयुक्त ठरतो. तसेच अनेक प्रकारच्या संसर्गजन्य रोगांपासून बचाव करण्यासाठी एंटीबॉडी आवश्यक असतात. चिक नवजात वासरांना प्रतिकारशक्ती मिळण्याचे एकमेव पौष्टीक आहार आहे. परंतु जन्मानंतर उशिरा चीक दिल्यामुळे वासराची अँटीबॉडीज शोषून घेण्याची क्षमता कमी होत जाते. वासरांच्या जन्मानंतर एका तासाच्या आत जर गाईला त्वरित दूध येत नसल्यास चांगल्या प्रतीचा पर्यायी चीक आहार वासराला वेळेवर प्रथम आहार म्हणून द्यावा.

 साठवणूक व संकलन

चिकाचे संकलन, साठवणूक अनिश्चित पाजण्याच्या दरम्यानची दूषित होण्याची शक्यता जास्त बळावते. त्यामुळे योग्य स्वच्छता ठेवणे महत्वाचे असते.  दुषित चिक पिल्यामुळे वासरांना आजाराचा धोका वाढतो. चीक साठवण्यासाठी शक्यतो स्वच्छ, कोरड्या भांड्याचा वापर करावा. अस्वच्छतेमुळे चिकामधील जिवाणू अँटीबॉडी शोषण्यासाठी वासरांच्या शरीरात अडथळा आणतात.

 


नवजात वासरांना किती चीक प्यायला द्यावा

 चीक प्यायला देण्याचे प्रमाण हे चिकाची गुणवत्ता, वासरांचे वजन, वेळ आणि पाजण्याची पद्धत यावर अवलंबून असते. शक्यतो चिक वासराच्या शरीराच्या वजनाच्या १० टक्के दिवसात विभागून द्यावा. गाईडमधील चिक स्त्राव संपल्यानंतर त्या नंतरच्या पहिल्या आठवड्याला दुधात काही अतिरिक्त पोषक घटक असतात. जे वासरांची वाढ आणि विविध पोषक तत्वांनी समृद्ध असतात. या व्यतिरिक्त अतिरिक्त प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी मदत करतात. वासरे जरी अशावेळी आपल्या रक्तप्रवाहात थेट अँटीबॉडी शोषून घेऊ शकत नाही, तरी अशा दुधातील रोग प्रतिकारक घटक स्थानिक रोगप्रतिकारशक्ती आणि अतिसारामुळे होणार या संक्रमणापासून संरक्षण करण्यास उपयुक्त ठरते.

English Summary: What is the importance of Chika in the diet of calf, is nutritious for calf
Published on: 07 October 2020, 05:42 IST