Animal Husbandry

सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी (Papari) गावात गायीने (Cow) एक नाही दोन नाही तर तब्बल चार वासरांना जन्म (Birth to four calf) दिल्याची घटना घडली. यामुळे याची चर्चा सध्या सुरु आहे. गायीच्या वासरांना बघण्यासाठी लोक गर्दी करत आहेत.

Updated on 18 February, 2023 12:18 PM IST

सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी (Papari) गावात गायीने (Cow) एक नाही दोन नाही तर तब्बल चार वासरांना जन्म (Birth to four calf) दिल्याची घटना घडली. यामुळे याची चर्चा सध्या सुरु आहे. गायीच्या वासरांना बघण्यासाठी लोक गर्दी करत आहेत.

गणेश लोंढे (Ganesh Londhe) असे गायीच्या मालकाचे नाव आहे. ही चार वाससे आणि गाय अगदी ठणठणीत आहे. एकाच वेळी चार वासरांचा जन्म होणं ही दुर्मिळ गोष्ट मानली जात आहे. 2018 मध्ये त्यांनी लक्ष्मी नावाची ही गाय खरेदी केली होती.

व्यवस्थित खुराक दिल्यानं गायीचे पोषण व्यवस्थित झाल्यानेच असे झाले असावे. ही गाय खऱ्या अर्थाने लक्ष्मी आहे. अशी प्रतिक्रिया शेतकरी गणेश लोंढे यांनी दिली. तिने पहिल्यांदा अशा पद्धतीने एकाच वेळी चार वासरांना जन्म दिल्याची घटना घडली आहे.

दुबईमध्ये 17 व्या आंतरराष्ट्रीय कृषी विज्ञान परिषद आणि प्रदर्शनाचे आयोजन, कृषी जागरणचाही सहभाग

या गाईला पहिल्यांदा खोंड झाले. त्यानंतर थोड्या वेळाने गायीनं तीन कालवडींना जन्म दिल्याची माहिती शेतकरी गणेश लोंढे यांनी दिली आहे. चार वासरांना जन्म देणारी गाय ही आपणास लाभदायक आहे. ही गाय खऱ्या अर्थाने लक्ष्मी असल्याचे शेतकरी गणेश लोंढे यांनी सांगितले आहे.

उस्मानाबादच्या कृषी प्रदर्शनात धेनू ॲप ठरले पशुपालकांचे प्रमुख आकर्षण, शेतकऱ्यांना होतोय फायदा..

दरम्यान, आपण गाईला एक किंवा दोन वासरे झाल्याचे एकले किंवा बघितले असेल. पण मोहोळ तालुक्याच एकाच वेळी गायीने चार वारसांना जन्म दिल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या गायीची आतापर्यंत चार वेळा प्रसूती झाली आहे. त्यात तिने पहिल्यांदा अशा पद्धतीने एकाच वेळी चार वासरांना जन्म दिल्याची घटना घडली आहे.

महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो भूजल संवर्धन आपल्या सर्वांची जबाबदारी
शेतकऱ्यांनो हा लेख तुमच्यासाठी! उत्पादन वाढतेय उत्पन्नवाढीचे काय? शेतकरी जातोय तोट्यात
शेतकऱ्यांनो सुधारित पद्धतीने वराहपालनास संधी

English Summary: What do you say! A cow gave birth to four calves in Solapur, all the calves are healthy.
Published on: 18 February 2023, 12:18 IST